रामटेक – राजू कापसे
रामटेक येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात स्वामी विवेकानंद ग्रंथालय आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून समर्थ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रामटेक येथून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य मा. श्री दीपकजी गिरीधर उपस्थित होते. सोबतच महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संचालन सुनाक्षी उपराडे ह्या विद्यार्थिनीने केले.
तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी केले पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिभा धमगाये यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले श्री दीपकजी गिरीधर यांनी जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व आपल्या भाषणाला सुरुवात केली.
त्यात त्यांनी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दी निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले मराठी भाषा ही राजभाषा असून तिचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मराठी भाषेच्या उत्पत्ती पासून तर आज अस्तित्वात असलेल्या मराठी भाषेबद्दल च्या महत्त्वासोबतच बोलीभाषा किती महत्त्वाची आहे त्यांनी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
श्री गिरीधर सरांच्या रसाळ अशा भाषाशैलीमुळे व त्यांनी सादर केलेल्या कवितेमुळे संपूर्ण विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन गेले होते. त्यांच्या भाषणानंतर लगेचच काव्यवाचन स्पर्धेला सुरुवात झाली. एकूण वीस विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. प्रा. डॉ. उज्वला देवरणकर यांच्या काव्य वाचनाने स्पर्धेची सुरुवात झाली.
त्यात प्रथम क्रमांक प्रांजल भाकरे, द्वितीय क्रमांक खुशी चावके तर तृतीय क्रमांक आरती हेनकुडे हिला मिळाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादामुळे काव्य वाचन फार चांगले रंगले. अशाप्रकारे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथम वर्षाचा विद्यार्थी अनुरागजबे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.