रामटेक – राजु कापसे
रामटेक येथील गांधी चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दि. २६ फेब्रुवारी ला सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वात, प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या आदेशानुसार नमो युवा चौपालचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला युवा मोर्चा प्रदेश सचिव चेतन खडसे, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा मंत्री अतुल हजारे, रामटेक विधानसभा समन्वयक संजय मुलमुले, ज्ञानेश्वर ढोक, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल किरपान, भाजपा शहर अध्यक्ष उमेश पटले याचे उपस्थित युवकांना मार्गदर्शन लाभले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या वतीने युवकांना मिळणा-या योजनांची सखोल माहिती देण्यात आली. व भविष्यात भाजपा सरकार आणखी सक्षम करण्याकरीता युवकांना आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन युवा मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला यांनी तर आभार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आलोक मानकर यांनी मानले. यावेळी संजय बिसमोगरे , चंद्रकांत बैस, पप्पू यादव, डॉ. विशाल कामदार, नंदकिशोर कोहळे, शुभंम बिसमोगरे, सागर गावंडे,ज्योती कोल्हेपरा, सत्यम शर्मा, खुशेंद्र डडोरे, तेजस्विनी चंदेल, समीक्षा धामगाये,
निलेश हटवार, नंदकिशोर पापडकार, करीम मालधारी, संदीप उरकुडे, खेमराज चाफले, धर्मेश ठक्कर, आनंदराव चोपकार, ओम धूरई, यश खेडकर सह अनेक भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.