Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीजहाल महिला नक्षली गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात...शासनाने जाहिर केले होते ६ लाख रुपयांचे...

जहाल महिला नक्षली गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात…शासनाने जाहिर केले होते ६ लाख रुपयांचे बक्षिस…

गडचिरोली – मिलिंद खोंड

फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे, इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने, अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या जहाल महिला माओवादीचे नाव राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा, वय 30 वर्षे, रा. बडा काकलेर तालुका भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) असे आहे. या महिला नक्षलीचा प्रत्यक्ष चार पोलीस – नक्षल चकमकीत सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

अटक जहाल महिला माओवाद्याबाबत माहिती नामे राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा दलममधील कार्यकाळ

  • सन 2006 साली चेतना नाट¬ मंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली.
  • सन 2010-11 साली चेतना नाट मंचामध्ये उप-कमांडर या पदावर पदोन्नती झाली.
  • सन 2016 साली फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन 2019 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.
  • सन 2019 साली पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) च्या जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.
  • सन 2020 मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती.
Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: