- जुनी नारसिंगी परिसरातील घटना.
- जलालखेडा पोलीसांची अवैध वाळु माफिया विरूध्द कार्यवाही.
- रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात.
- ट्रॅक्टर चालक व मालकांवर गुन्हा दाखल.
नरखेड – अतुल दंढारे
अवैध रेती वाहतूक करणारे 4 ट्रॅक्टर पोलिसांनी शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास जुनी नारसिंगी येथून ताब्यात घेतले. जलालखेडा येथून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनी नारसिंगी परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याचे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना दिसले.
पोलिसांनी चारही ट्रॅक्टर थांबवून त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडे कागदपत्राची विचारणा केली असता कागदपत्रे आढळून आलो नाही. त्यामुळे पोलिसांनी चारही ट्रॅक्टर ताब्यात घेतले. MH-40 A-4070 व ट्रॉली, MH-40-CQ-6983 व ट्रॉली, MH-32-A- 8995 तसेच यातील एक ट्रॅक्टर आरटीओ पासिंग नसल्यामुळे त्याला नंबर सुध्दा मिळालेला नाही.
चारही ट्रॅक्टर पोलिस दिसताच पळून जाऊ लागले परंतु पोलिसांनी पाठलाग करून जुनी नारसिंगीच्या पांदन रस्त्यावर पकडले व त्यांना थांबवून पाहणी केली असता वरील चारही ट्रॅक्टर मध्ये रेती आढळून आली.
याबाबत ट्रॅक्टर चालकास व मालकास ट्रॅक्टर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्यांची खात्री झाल्याने वरील चारही ट्रॅक्टर मध्ये 4 ब्रॉस रेती किंमत 20 हजार रुपये, ट्रॅक्टर ट्रॉली किंमती 29 लक्ष 25 हजार रुपये असा एकुण 29 लक्ष 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पोलिसांनी सुनील भीमराव खंडार वय वर्ष 30, पंकज शेषराव लोलुसरे वय वर्ष 30,
विशाल शिवलाल उईके वय वर्ष 21, सुरेश रामेश्वर भोयर वय वर्ष 43, नितीन जानराव सोनोने वय वर्ष 20 रा. नारसिंगी, पवन शंकर मानकर वय वर्ष 34 सर्व राहणार नारसींगी, विजय संतोष उईके वय वर्ष 27 रा. जामगाव, मनीष प्रभाकर राऊत वय वर्ष 33 रा.भारसिंगी या सर्व ट्रॅक्टर चालक व मालक यांचे विरूध्द कलम 379, 109 भादवी सहकलम 48 (7),48(8) महा.ज.म.स. सहकलम 4,21 खाणी आणि खनिजे अधिनियम 1789 सहकलम 3 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 अन्वये पोलीस स्टेशन जलालखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही ठाणेदार चेतनसिंग चौहान, उपनिरीक्षक मनोज शेंडे, पोलीस अंमलदार हरीहर सोनोने, रविंद्र मोहोड, निलेश खरडे, संतोष क्षिरसागर व होमगार्ड यांनी केली असून पुढील तपास दिनेश जोगेकर व संलोचना दुपारे करित आहे.