Tuesday, January 7, 2025
Homeराज्यभागवत सप्ताह च्या समाप्तीला हमलापुरी येथे ६० लक्ष ₹ याचे विविध विकास...

भागवत सप्ताह च्या समाप्तीला हमलापुरी येथे ६० लक्ष ₹ याचे विविध विकास कामांचे भूमिपूजन…

रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचे शुभहस्ते,पंचायत समिती सभापती नरेंद्र बंधाटे यांचा अध्यक्षतेत संपन्न…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील हमलापुरी(चीचाळा)येथे हनुमान मंदिर परिसरात भागवतचार्य ह भ प नागपुरे महाराज यांचा सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताह कथेची सांगता आज गोपालकाला व महाप्रसादाने झाली.

भागवत सप्ताह च्या मुहूर्तावर रामटेक पंचायत समितीचे सभापती नरेंद्र बंधाटे यांचा प्रयत्नातून मंजूर झालेले जिल्हा परिषद शाळा हमलापुरी येथे पेवर ब्लॉक लावणे ११.६२लक्ष ₹,समाज भवन येथे पेवर ब्लॉक लावणे १०लक्ष ₹, स्मशानभूमी येथे पेवर ब्लॉक लावणे ६.१६लक्ष ₹, बुद्ध विहार येथे पेवर ब्लॉक लावणे ७.३९लक्ष ₹,जिल्हा परिषद शाळा ते पगारवार यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ९.९५लक्ष ₹,शंकर ठकरेले ते जयराम ठकरेले यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ६.५०लक्ष ₹,

परमात्मा एक भवन ते आत्माराम ठकरेले यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ४लक्ष ₹, ग्यानिराम बंधाटे ते जीवन बंधाटे यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ४लक्ष ₹ असे एकूण ६०लक्ष रुपयाचे विकास कामाचे भूमिपूजन माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचा हस्ते संपन्न झाले.

भूमिपूजन प्रसंगी पंचायत समिती रामटेक चे सभापती नरेंद्र बंधाटे,सरपंच कविता बसिने,उपसरपंच सुनील गयगये,पंचायत समिती रामटेक चे A.P.O.अर्जुन खेवले,पंचायत समिती अभियंता प्रमोद गोल्हर,ग्राम पंचायत सदस्य श्रावण ठकरेले,शेषराज मोहारे, ओमेंद्र मोहारे,पार्वताबाई ठकरेले,बबिता दमाहे,नंदकिशोर कोहळे,देवचद ठकरेले,

गोपीचंद ठकरेले,रामकिशन ठकरेले,भास्कर गयगये,रामेश्वर ठकरेले,दिनेश ठकरेले,मंसाराम ठकरेले,रामेश्वर दमाहे,महेंद्र बंधाटे,जयपाल बांधते,खुशाल पिसोडे,शंकर ठकरेले,निलेश वाघमारे,सहित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: