Saturday, December 21, 2024
HomeकृषीWeather Update | पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी रोजी दरम्यान वादळी...

Weather Update | पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी रोजी दरम्यान वादळी पावसाची शक्यता…

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

Weather Update : (गोंदिया) पूर्व-विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे.

या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: