Thursday, October 24, 2024
Homeराज्यरामटेकात कचरा उचलायला यंत्रणाच नाही; मुख्याधिकारी यांचे कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष्य...

रामटेकात कचरा उचलायला यंत्रणाच नाही; मुख्याधिकारी यांचे कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष्य…

रामटेक – राजू कापसे

रामटेक ३१ हजार लोकसंख्या असलेल्या रामटेक शहरात सध्या अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच सध्या डेंग्यू, मलेरियाचा आजारही पसरत आहे. तरीही प्रशासन साफसफाईकडे दुर्लक्ष करीत आहे. कारण कचरा उचलण्यासाठी यंत्रणाच नाही.

रामटेक शहरात साथरोगाचे रुग्ण प्रमाणात आढळत आहे. रामटेक उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयात दररोज रुग्ण येत आहेत. प्रत्येक कुटुंबात एखादा रुग्ण, अशी भयावह परिस्थिती आहे.

नगरपरिषदेकडून यावर पाहिजे तशी उपाययोजना होताना दिसत नाही. गंभीर म्हणजे, रामटेक नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी असुन स्वच्छेतेकडे अजिबात लक्ष नाही. रामटेक मधील राजाजी वार्ड येथील रोज काँवेन्ट जवळ मागील ८ दिवसा पासुन कचरा पडलेला असुन कचरा गाडी वाल्यांनासांगीतले तर तो म्हणतो आम्हाला उचलता येत नाही.

पहीले सकाळी ६:३० कचरा गाडी कचरा घेण्याकरीता येत होती. परंतु आता कचरा गाडी केव्हाही कचरा घेण्या करीता येतात. कचरा दुपारी टाकण्यासाठी व्यक्ती घरी राहायला पाहीजे. अशी रामटेक नगर परीषेदची स्वच्छेतेची कचरा गाडीची खराब यंत्रना झाली आहे. नगरपरिषदेकडून कचरा उचलण्यासाठी सात मालवाहू गाड्या आहेत.

यापैकी दोन गाड्या बंद आहे. पाच- सहा गाड्यांच्या भरवशावर शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज कचरा उचलला जात नाही. एकदा कचरा उचलला की, तिथे परत तीन ते चार दिवस गाडी फिरकत नाही. शहरात कचराही रस्त्यावर पडलेला आहे. डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी यावर ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: