मूर्तिजापूर : मागील दोन दिवसांपासून CBSE बोर्डाच्या 10,12 वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून शहरातील एका नामांकित संस्था अकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कुल बद्दल पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे. कारण दहावीच्या परीक्षेत बसणारे याच शाळेतील 15 विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात मान्यता व परिचय पत्र उशिरा मिळाल्याने त्यांना सुरुवातीच्या एका पेपरला मुकावे लागले. जर शाळेस CBSE बोर्डाची मान्यता असतांनाही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी संघर्ष करीत कोर्टाचा सहारा घ्यावा लागला यामध्ये चुकी कोणाची? बोर्डाची की मॅनेजमेंटची?…मात्र परीक्षा तोंडावर आली तेव्हा या शाळेच्या मॅनेजमेंटला जाग आली. मॅनेजमेंटच्या हलगर्जीपणामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला समोर जावे लागले आहे.
कोणतेही शहानिशा न करता आपल्या पाल्यांची अडमिशन घेवून व भरमसाठ फी भरून सुद्धा नाहक त्रास सहन करणाऱ्या पालकांची अवस्था फार कठीण झाली होती, शहरात आपल्याच्या संस्थेला सीबीएससी बोर्डाची मान्यता आहे असे सांगून अनेक विद्यार्थ्यांचा प्रवेश या संस्थेने घेतला आहे. मात्र यावेळी 10 च्या विद्यार्थ्यांमुळे शाळेच बिंग फुटले आणि पालकांनाही धक्काच बसला. आता आपली आणखी बदनामी होईल याआधीच पालकांना विश्वासात घेवून संस्थेच्या विरोधातच केस दाखल करून घेत अखेर विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी मा.कोर्टाने विद्यार्थ्यांना दिली.
पालकांच्या वतीने मूर्तिजापूर येथील ॲड अविन अग्रवाल, कैलास अग्रवाल,ॲड मोहगावकर, ॲड ऋग्वेद ढोरे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली, आणि मा. हायकोर्ट यांनी यासंदर्भात तातडीने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये असे आदेश काढले तेव्हा कुठे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवात जीव आला आणि यासंस्थेला बोर्डाकडून काही प्रमाणात दंड देणार असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.