Sunday, December 22, 2024
Homeराज्यदेशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची गॅरटी भाजपा सरकारने द्यावी -...

देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची गॅरटी भाजपा सरकारने द्यावी – आ. नितीन देशमुख…

पातूर – निशांत गवई

शेतकर्‍याच्या विविध मागण्या करीता बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हात ५०० की.मी अंतराची संगर्ष यात्रा काढली असुन या देशात मोदी गॅरटी देत आहे परतू देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची गॅरटी देशाचे पंतप्रधान मोदी यानी द्यावी शेतकर्‍याना आपल्या हक्का करीता रस्तावर यावे लागणार नाही याची गॅरटी द्यावी राज्यातील शेतकर्‍याना सोयाबीनला ६ हजार रुपये भाव मिळाला पाहीजे म्हणुन देवेन्द्र फडणविस यानी यात्रा काढली होता.

मग आत त्याचे सरकार असताना शेतकर्‍याच्या सोयाबीन पिकाला भाव का मिळत नाही असा सवाल उपस्थीत करुन संघर्ष यांत्रेच्या माध्यमातुन आमदार नितीन देशमुख यांनी भाजपावर निशाणा साधला बाळापुर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकर्‍याना सोयाबीन पिकाला खाजगी बाजरात किमान १० हजार तर कपाशीली १५ हजार रुपये भाव मिळावा,

कपाशीला तिन हजार रुपये प्रति क्वींटल व एकरी सात हजार रुपये अनुदान देण्यात यावे कपाशी व तुरीची आयात थाबविण्यात यावी पिक विमाच्ी रक्कम तात्काळ शेतकर्‍याच्या खात्यात जमा करण्यात यावी नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍याना ५० हजार रुपये प्रोत्साहनपन अनुदान शेतकर्‍याच्या खात्यात जमा करण्यात यावे २ लाख रुपये कर्ज माफी पासुन वंचित शेतकर्‍याना तात्काळ कर्ज माफ करावे शेतकर्‍याना ट्रक्टर करीता डिझेल व पेट्रोलवर सबसिडी द्यावी शेतकर्‍याच्या शेती कामावरील शेतमजुराना नरेगा मार्फत मजुरी देण्यात यावीसोयाबीनला प्रति क्वीटल ३ हजार व एकरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात यावे या मागणी करीता जिल्हात संघर्ष यात्रा सुरु केली असुन पातूर तालुर्‍यात या संघर्ष यात्रेचे ठिक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

ग्रामीण भागातील खामखेड, आगिखेड,गावात टाळ मुंदुग वाजवित शेतकर्‍यानी या यात्रेसह सहभाग नोदविला उध्दव बाळासाहे ठाकरे यांनी शिवसेनेची ही ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करते उध्दव ठाकरे साहेबाची शिवसेना ही शेतकर्‍याचे हीत जपणारी असुन देशाला व्यापार्‍याच्या हातातुन जावु द्यायचे नसल्यास देशातील व राज्यातील शेतकरी व सर्वसामान्याचे विरोधातील सरकारला खाली ओढल्या शिवाय पर्याय नसल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगीतले या संघर्ष यात्रे मध्ये जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राहूल कराळे माजी आमदार दाळु गुरुजी, हरिदास भदे, संजय गांवडे, तालुका प्रमुख रविन्द्र मुर्तडकर, शहर प्रमुख निरंजन बंड यांच्यासह जिल्हातील व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थीत होते.

आमदार नितीन देशमुख यांनी संघर्ष यात्रेचे पातूर तालुक्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले अनेक ठिकाणी त्याचे औ़क्षवण करण्यात आले टाळ मुंदुगासह गावा गावा स्वागत करण्यात आले पातूर शहरातील टिकेव्ही चौक, जुने बस स्थानक चौक, संभाजी चौकात यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले या यात्रेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: