रामटेक – राजु कापसे
राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथील दोन विद्यार्थ्यांची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या व नुकताच निकाल लागलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत चमकदार कामगिरी करत सुयश प्राप्त केले आहे.
या परीक्षेत इयत्ता आठवीतील १९ विद्यार्थी बसले होते. यापैकी विकेश कोरचे व सेजल कळमकर हे पात्र ठरले असल्याने त्यांना दरवर्षी १२ हजारप्रमाणे ५ वर्षांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सोनीराम धोटे, शिक्षक राजीव तांदूळकर, साक्षोधन कडबे, नीलकंठ पचारे, दिलीप पवार, सतीश जुननकर, प्रशांत पोकळे, शैलेंद्र देशमुख, अमित मेश्राम, सौ. तारा दलाल, सौ. अर्चना येरखेडे, करीना धोटे, कर्मचारी राशिद शेख, मोरेश्वर दुनेदार आणि शाळेचे विद्यार्थी यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले. अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे परिसरातील पालक वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.