अकोला – संतोषकुमार गवई
फेब्रुवारीच्या मासिक निवृत्तीवेतन देयकातून प्राप्तीकराची कपात करणे नियमानुसार करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नियमित व कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या वेतनातून करावयाच्या कपातीबाबत लेखी अर्जाद्वारे कळवावे, असे आवाहन जिल्हा कोषागारातर्फे करण्यात आले आहे.
वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात देय प्राप्तीकराची गणना करणेबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या मासिक निवृत्तीवेतनातून जुन्या प्राप्तीकर प्रणालीनुसार प्राप्तीकर कपात करावयाची असल्यास दि.15 फेब्रुवारीपर्यंत बचतीच्या प्रमाणपत्रासहित लेखी अर्ज करावा, असे आवाहन अकोला जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी केले.