उचीत मोबदला देवून उत्तराधिकाऱ्याला नोकरी देण्याची रेटली होती मागणी…
रामटेक – राजु कापसे
भुस्खलन होवुन मलब्याखाली दबल्याने ३० वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच दि. ११ फेब्रुवारी ला दुपारी १२ च्या सुमारास कांद्री माईन येथे घडली. चेतन लख्खु राऊत वय ३० वर्ष रा. हेटीटोला असे मृतकाचे नाव असुन तो कांद्री माईन येथे ठेका मजुर म्हणुन कार्यरत होता.
उचीत मोबदला तथा परिवारातील उत्तराधिकाऱ्याला नोकरी द्यावी अशी मागणी माजी पंचायत समीती उपसभापती उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांनी श्रम व रोजगार, वन पर्यावरण केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांना एका पत्राद्वारे केलेली होती व तसेच मॉईल कडेही तशी मागणी रेटुन धरली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असुन मृतकाच्या परिवाराला तब्बल २३ लाखांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती कांद्री खदान चे प्रबंधक मनोज मोंढे यांनी दिली.
कांद्री खदान येथे भुस्खलन होवुन हेटीटोला येथील रहीवाशी असलेल्या चेतन लख्खु राऊत याचा मृत्यु झाला. माहिती मिळताच माजी पंचायत समिती उपसभापती गज्जु यादव यांनी पुढाकार घेत मृतकाच्या परिवाराला उचीत मोबदला तथा उत्तराधिकाऱ्याला नोकरी ची मागणी रेटुन धरली होती. यासंबंधीचे एक पत्र मंत्रीमहोदयांना सुद्धा त्यांनी दिले होते. एकंदरीत घटनेची दखल घेत मॉईल प्रशाषनाने हालचाली सुरु केल्या व अखेर मृतकाच्या परिवारास २३ लाखांपर्यंत मोबदला मिळणार असल्याचे मॉईल प्रशाषणाकडुन सांगण्यात आले आहे.
याबाबद कांद्री खदान चे प्रबंधक मनोज मोंढे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मृतक चेतन राऊत हा येथे एका कंत्राटदाराकडे कार्यरत होता. त्याचा पीएफ, इंशोरन्स तथा इतर बाबी मिळून त्याच्या परिवारास तेविस लाख रुपयांपर्यंत मोबदला दिला जाणार आहे तसेच त्याच्या परिवारातील सदस्याला कंत्राटदाराकडे नोकरी देण्यात येणार असुन मृतकाच्या पत्नीस विधवा पेंशन दिल्या जाणार असल्याची माहिती प्रबंधक मनोज मोंढे यांनी दिली.
अनेकांनी केले गज्जु यादव यांचे कौतुक
गज्जु यादव यांनी पुढाकार घेऊन मॉईल प्रशाषणा कडून विनाविलंब हालचाली घडवुन आणल्या व परिणामस्वरूप मृतकाच्या परिवारास उचीत मोबदला तथा विविध बाबींचा लाभ मिळणार आहे यामुळे सोशल मिडीयावर गज्जु यादव यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे