Disney+Hotstar : प्रत्येकजण OTT प्लॅटफॉर्म वापरतो, परंतु कंपन्या पासवर्ड शेअरिंगबाबत नवनवीन पावले उचलत असतात. काही काळापूर्वी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. आता डिस्ने + होस्टस्टार देखील असेच काही करत आहे. म्हणजेच आता तुम्ही यावरही पासवर्ड शेअर करू शकणार नाही.
गेल्या वर्षी ही माहिती देताना डिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांनी एक संकेत दिला होता. घराबाहेर पासवर्ड शेअर करण्याबाबत आम्ही नवीन पावले उचलू शकतो, असे ते म्हणाले होते. पण आता यालाही दुजोरा मिळाला आहे. डिस्नेचे चीफ फाइनेंशियल ऑफिसर ह्यू जॉन्स्टन यांनी बुधवारी सांगितले की, त्यांनी चुकीच्या पद्धतीने शेअर केलेल्या पासवर्डच्या विरोधात कारवाई केली आहे आणि ही खाती निलंबित केली जातील.
आता यानंतर डिस्ने + हॉटस्टारकडून पासवर्ड शेअरिंगवर कारवाई केली जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. याचा अर्थ आता तुम्ही फक्त कुटुंबातील सदस्यांमध्येच पासवर्ड शेअर करू शकाल. या बाहेर पासवर्ड शेअर केल्यास अशा युजर्सची खाती निलंबित केली जातील. पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्यात येत असल्याचे कंपनीकडून पूर्णपणे स्पष्ट करण्यात आले. अशा परिस्थितीत, एकाच घरातील नसलेले वापरकर्ते पासवर्ड शेअर करू शकणार नाहीत.
जॉन्स्टन म्हणाले होते, ‘आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. आम्हाला आमच्या सामग्री समजून घेण्याद्वारे हे शक्य करायचं आहे. ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी आम्हाला ही पावले उचलायची आहेत. यामुळे ग्राहकांचा अनुभवही सुधारेल. याशिवाय कंपनीचे ग्राहकही वाढतील. तरीही एखाद्याला पासवर्ड शेअर करायचा असेल तर त्याला त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील. अतिरिक्त शुल्क भरल्यानंतर ते त्याचा लाभ घेऊ शकतील.