मूर्तिजापूर : शहरातील प्रतिष्ठित समाजसेवक व माजी नगरसेवक ॲड.शरददादा बाबाराव पाटील भटकर यांचे वयाच्या 66 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते गेल्या काही महिन्यापासून आजारी असल्याने घरातच त्यांचावर उपचार सुरू होता, त्यांच्या अचानक निघून जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील रंभापूर हे शरददादा यांचे गाव, प्राथमिक शिक्षण मूर्तिजापूर पासून ते उच्चशिक्षण नागपूर पर्यंत असा त्यांचा शिक्षणाचा प्रवास, विद्यार्थीदशेपासून राजकीय तसेच सामाजिक चळवळीत सक्रीय होते. त्यांची आणि डॉक्टर श्रीकांत जिचकर यांची चांगली मैत्री असल्याने यांच्या नेतृत्वाखाली अधिक चांगले काम करू लागले होते. आधी भाजपात आणि नंतर शिवेसेनेसोबत त्यांनी काम केले.
सोबतच मूर्तिजापूर नगरपालिकेच्या नगरसेवक पदही भूषविले. त्यांचा मुलगा देवाशिष हे पंचायत समितीचे उपसभापती पदावर आणि तिन्ही भावंड शेती करून तालुक्यातील सदन कास्तकार म्हणून ओळख आहे. त्यांचा प्रेमळ स्वभाव त्यांची ओळख होती मात्र अचानक निघून गेल्याने तालुक्यात शोककळा पसरली.
दि.8/2/2024 गुरुवार रोजी त्यांची अंत्ययात्रा गवारीपुरा मूर्तिजापूर त्यांच्या निवासस्थानाहून दुपारी चार वाजता अमरावती रोड स्मशानभूमी येथे होणार आहे..