मूर्तिजापूर : ‘मोदी सरकार’ असा उल्लेख करून मतदारांच्या हृदयाला साद घालण्याचा प्रयत्न बुमरँग करून मूर्तिजापूर मतदार संघातील एका शेतकऱ्याने भाजपावरच उलटविला असून मूर्तिजापूर मतदारसंघात खळबाळ उडवून दिली आहे.
कालपरवा पासून एका शेतकऱ्याची ऑडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्या ऑडीओ क्लिपने मूर्तिजापूर मतदारसंघातील मतदारांना खळबळून जागे करण्याच काम केलंय. शेतकऱ्यांची आताची शेतमालाच्या भावाची अवस्था सांगणारी ती क्लिप आहे. भाजपच्या IT सेलची ती ऑडिओ क्लिप आहे आणि शेतकऱ्याने सडेतोड उत्तर देऊन कॉल करणाऱ्या महिलेला कस शांत केलंय.
अवघ्या दोन महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणुका लागणार असल्याने भाजप निवडणुकीपूर्वी मतदारांचा कल घेण्यासाठी अश्या कॉल सेन्टरवरून कॉल करण्याचा धडाका सुरू केला आहे. राजकीय सूत्रांकडून, मागील दोन तीन महिण्याआधी राज्यात तावडे समितीने एक सर्वे केला होता, त्या सर्वेत राज्यात भाजपला मोठा फटका बसणार आहे, त्यात अकोला जिल्ह्याचा सर्वे तर खूपच वाईट होता. जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट, अकोला पूर्व या तीन ठिकाणी भाजपला नुकसान होणार असल्याचे या सर्वेक्षणात समोर आलय. त्यामुळे भाजप जिल्ह्यात वेगवेगळया पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवित आहे, मात्र या कार्यक्रमाचा फायदा भाजपला होणार नसल्याचे या ऑडिओ क्लिप मधून दिसत आहे.
भाजप कोणत्या थराला जाऊन राजकारण करते आणि शेतकऱ्याची कशी पिळवणूक करते हे आपण अनुभवतोय. तुम्ही निवडुन दिलेला प्रतिनिधी तो कधीही शेतकऱ्याचा आवाज बनला नाही किंवा त्याने आपल्या सरकार पर्यंत शेतकर्यांचे म्हणणे मांडले नाही. अश्या प्रतिनिधीला काय पुन्हा निवडून द्याल? बर वैचारिक पातळी काय आहे?,सर्व समाजाला घेऊन चालतो?, कोणी कानात कुजबुजले की लगेच बीफरणारा, तुमचा गावातून मत कमी मिळाले म्हणून तुमचं काम करण्यास नकार देणारा?, विकासाच्या नावावर 10 % घशात घालणारा?….
मतदार संघातील जनता आता जागरूक झालीय, तुम्ही पैठणी वाटा, काहीही वाटा तर काहीच फरक पडणार नाही. कारण एकच चेहरा पाहून लोकही कंटाळले आहेत. लोकांना हवा भावी फ्रेश चेहरा ज्याला कमिशनची गरज लागणार नाही, जो जनतेचा आवाज बनणार, सर्वच समाजाला चालणारा…भाजप अश्याच चेहऱ्याची निवड करणार का?…अशी जनसामान्यात चर्चा सुरु आहे.