UP News : उत्तरप्रदेशातील लखनौ जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या कारागृहात शिक्षा भोगत असलेले 36 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. या संदर्भात लखनऊचे तुरुंग अधीक्षक आशिष तिवारी यांनी ही माहिती मिडीयाला दिली आहे. यूपी एड्स कंट्रोल सोसायटीच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये चाचणी घेतली होती. कारागृह प्रशासनाने कैद्यांवर उपचार आणि समुपदेशन सुरू केले आहे. बाधित कैद्यांचा डोसही वाढवण्यात आला आहे.
लखनौ कारागृहाचे तुरुंग अधीक्षक, आशिष तिवारी यांनी एबीपी लाइव्हला सांगितले की, तुरुंगात नवीन आलेल्या सर्व कैद्यांची मासिक आधारावर एड्सची चाचणी केली जाते, ज्यासाठी आरोग्य विभागाकडून चाचणी किट उपलब्ध करून दिली जाते.
ऑगस्ट 2023 नंतर टेस्टिंग किट कालबाह्य झाल्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कारागृहात बंदिवानांची एचआयव्ही चाचणी होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर शिबिरे आयोजित करण्यात आली आणि सर्व जिल्ह्यांमध्ये किट उपलब्ध झाल्यानंतर चाचणी करण्यात आली, त्यात लखनौ कारागृहातील 36 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले.
Lucknow, Uttar Pradesh: 36 prisoners in Lucknow district jail have been found HIV positive. The health department conducted the examination in December 2023, on the orders of the UP AIDS Control Society. The jail administration has started treatment and counselling of the…
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 4, 2024
कारागृह अधिकाऱ्याने सांगितले की, लखनौ तुरुंगात गेल्या 3 महिन्यांत दाखल झालेल्या कैद्यांचा हा आकडा आहे. यातील बहुतांश कैदी अंमली पदार्थांचे व्यसनी आहेत आणि ते सर्वजण सिरिंजद्वारे अंमली पदार्थांचे सेवन करतात.