Ramayan will be aired on TV again : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा झाल्यानंतर प्रत्येक भक्त त्यांच्या रामलल्लाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वात जास्त पाहिलेली धार्मिक मालिका रामायण डीडी नॅशनलवर प्रसारित होणार आहे. रामानंद सागर यांच्या रामायणाबद्दल बोलत आहोत, ज्याचे प्रसारण जाहीर झाले आहे.
1987 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर आलेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने सगळीकडे खळबळ उडवून दिली होती. रामायानासाठी कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असू द्याला त्याला रामायण खूप आवडायचं. मागील दोन वर्षाआधी कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन असतानाही तेव्हा परत रामायण टीव्हीवर परतले आणि सर्वाधिक पाहिला जाणारा शो बनले. आता पुन्हा रामायण एकदा छोट्या पडद्यावर येत आहे.
दूरदर्शनने त्याच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर घोषणा केली की रामानंद सागर यांचा ‘रामायण’ पुन्हा टेलिव्हिजन पडद्यावर येणार आहे. एक छोटी क्लिप शेअर करत, ट्विटमध्ये असे लिहिले आहे की,रिपु रन जीति सुजस सुर गावत। सीता सहित अनुज प्रभु आवत॥ प्रभू श्री राम आले ! भारतातील सर्वात लोकप्रिय शो ‘रामायण’ पुन्हा एकदा परतला आहे. रामानंद सागर यांचे रामायण पुन्हा एकदा #DDNational वर 5 फेब्रुवारीपासून दररोज संध्याकाळी 6 वाजता पहा आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रसारित होणार आहे.
रिपु रन जीति सुजस सुर गावत।
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) February 1, 2024
सीता सहित अनुज प्रभु आवत॥
आ गए हैं प्रभु श्री राम! एक बार फिर वापस आ गया है पूरे भारत का सबसे लोकप्रिय शो 'रामायण'। रामानंद सागर की रामायण एक बार फिर #DDNational पर देखिए 5 फरवरी से प्रतिदिन शाम 6 बजे और पुनः प्रसारण दोपहर 12 बजे। #Ramayan |… pic.twitter.com/oct1kTAwBc
प्रसारित झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांनी आनंद असून रामायणचे प्रक्षेपणाची वेळ बदलाल सांगत आहे. काही लोक लिहित आहे कि कृपया दूरदर्शनवरील रामायणाची वेळ बदलून रात्री 9 ची करा. ही विनंती आहे कारण मुले देखील शिकवणीतून आणि पुरुष नोकरीवरून (खाजगी नोकरीत) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परतत नाहीत. मुलांनी आणि मोठ्यांनी एकत्र रामायण पाहावे अशी आमची इच्छा आहे.