Sunday, September 22, 2024
Homeराज्यश्री संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाचे शहरातील...

श्री संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाचे शहरातील मोठी उमरीत भव्य आयोजन…

अकोला – अमोल साबळे

श्री संत जगद्‌गुरू तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला असून, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शहरातील मोठी उमरीत करण्यात आले आहे. सप्ताह २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, यामध्ये काकडा, संत तुकाराम महाराज जीवन चरित्र, रात्री हरिकीर्तन सेवा पार पडणार जाहे. तसेच सप्ताहामध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

संगीतमय कथा प्रवक्ते संदीप महाराज खामणीकर यांच्या अमृततुल्य वाणीतून दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहे. या सप्ताहामध्ये रोज रात्री ८:३० ते १०:३० या वेळेत ३० जानेवारी रोजी हभप पोपट महाराज आळंदी, ३१ जानेवारी हभप भरत महाराज चौधरी, १ फेब्रुवारी मंगेश महाराज वराडे दाताळकर, २ फेब्रुवारी रवींद्र महाराज हरणे, मुक्ताईनगर व हभप श्रीगुरू प्रा. बाळासाहेब ज्ञानेश्वर माउली महाराज देहूकर, श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे.

श्री संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज आणि वारकरी परंपरेचे अधिकारी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे, तसेच हभप मीराबाई सरोदे व विठ्ठल भजनी महिला मंडळ, विठ्ठल नगर व सांप्रदायिक भजनी मंडळ मोठी उमरी, हनवाडी, नांदखेड, विश्वरूपणी सांप्रदायिक महिला भजनी मंडळ, मोठी उमरी सहभागी होणार आहे

या मंदिर कलशारोपण! हभप प्रदीप महाराज सांबारे संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर यांच्या हस्ते मंदिर कलशारोपण होणार आहे. तर, हभप रवींद्र महाराज हरणे व केशवराव भालतिलक यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहातील कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष गजानन थोरात, उपाध्यक्ष विठ्ठल माहोकार, सचिव देवीदास पोटे, सहसचिव मनीष गुजरकर, कोषाध्यक्ष आत्माराम शेळके, संचालक डॉ. दिनकर चांदणे, पुरुषोत्तम धोत्रे, नीलेश दहिमात, प्रमोद लांडगे, मनीष नळे, विष्णू गोंडचवर, नितीन पाचकोर, देवीदास भारसाकळे, विठ्ठल लोचे, निखिल बारकर,

भालचंद्र मराटे, जनार्दन तेल्हारकार, दीपाली वाकडे, प्रमिला जवंजाळ, पद्मिनी गावंडे, जयश्री गावंडे, सुरेश पोतले, रामेश्वर बांदणे, संजय मराठे, प्रमोद काळमेघ, संदीप राहूडकर, डॉ. चंद्रकांत वानखडे, महादेवराव नळे, शरद पोतले यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: