Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकअकोला | द्रूतगती महामार्गावर नियमांचे पालन करा...प्रकल्प संचालक राकेश जवादे यांचं प्रतिपादन...

अकोला | द्रूतगती महामार्गावर नियमांचे पालन करा…प्रकल्प संचालक राकेश जवादे यांचं प्रतिपादन…

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

संतोषकुमार गवई, अकोला

अकोला: ३१ जानेवारी २०२४ रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तर्फे कॉन्ट्रॅक्टर माँटे कार्लो आणि सल्लागार लॉयान इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त अभियानाने पस्तीसाव्वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहा भोसले फार्मसी कॉलेज वाशीम हायवे येथे आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी भा. रा. रा. प्रा. चे प्रकल्प संचालक श्री. राकेश जवादे होते. त्या अंतर्गत सल्लागार कंपनीचे (consultant team) चे श्री. व्ही. व्ही कुलकर्णी, श्री. विनोद डोंगरे आणि श्री. अमोल कासुलकर यांनी रस्ते सुरक्षा बाबत महिती विषद केली.

कॉन्ट्रॅक्टर माँटे कार्लो चे प्रकल्प व्यवस्थापक श्री राजेश सोनी यांनी रस्ते सुरक्षेच्या १० गोल्डन टिप्स सांगितल्या. अध्यक्ष भा. रा. रा. प्रा. चे प्रकल्प संचालक श्री. राकेश जवादे यांनी रस्ते सूरक्षे बाबत मार्गदर्शन केले आणि कॉलेज विद्यार्थ्यांनाआणि कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याची विनंती केली. कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती इंगळे यांनी आश्वासित केले की कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचारी हेल्मेट चा वापर व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काशिनाथ तिवारी यांनी केले. यावेळी सल्लागार कंपनीचे श्री मिलिंद बाकडे, श्री अझहर खान, श्री रिझवान पठाण, श्री प्रफुल चाफले आणि श्री साहिल मिसाळ उपस्थित होते तसेच कॉन्ट्रॅक्टर माँटे कार्लो चे श्री. गोविंद धामी, श्री. मनोज यादव आणि श्री. सुबिर हे उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: