जात सर्वेक्षण : नमुन्यात जातीच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहा बौद्ध जनतेला आवाहन -बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा प्रभारी मंगेश कांबळे
मालेगाव – चंद्रकांत गायकवाड
महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्ग आयोगाकडून मराठा मराठा आरक्षण सर्वेक्षण करण्याचे काम दिनांक २३ जानेवारी २०२४ पासून सुरु झाले असून, त्यासाठी महानगरपालिकांचे कर्मचारी, व शिक्षक कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी भेट देत आहेत.
सदर सर्वेक्षणाच्या नमुन्यामध्ये (फॉर्म) बौद्ध व्यक्तीने ‘जात’ या कॉलम (A2) मधील ‘इतर’ या कॉलम (A2-1) मध्ये बौद्ध (बुदिस्ट) लिहावे. तसेच धर्म या कॉलम (A15- 1) मध्ये बौद्ध लिहावे. याबाबत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा प्रभारी मंगेश कांबळे,
इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी, समाजातील सुशिक्षित जनतेने, तसेच होळी करताना बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा प्रभारी मंगेश कांबळे, नारायण पडघान, डळे सर, धम्मदास वाकोडे, मुकेश खिलारे. अश्विन वाघमारे,आकाश आवचार आकाश सावंत, आनंद इंगळे,व कार्यकर्त्यांनी बौद्ध जनतेला माहिती करून द्यावी, त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.