Virat Kohli : भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने एक मोठा पराक्रम केला आहे. 2023 हे वर्ष कोहलीसाठी खूप चांगले वर्ष होते. यावर्षी कोहलीच्या बॅटमधूनही अनेक शतके झाली. याच कारणामुळे आयसीसीने आता कोहलीला एक मोठी भेट दिली आहे. ही भेट मिळाल्यानंतर कोहलीने भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मागे टाकले आहे.
कोहलीची ICC पुरूष वनडे क्रिकेटर ऑफ द इयर निवड झाली आहे. आयसीसी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला, त्यामुळेच आयसीसीने कोहलीला मोठी भेट दिली आहे.
𝗜𝗖𝗖 𝗠𝗲𝗻'𝘀 𝗢𝗗𝗜 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗬𝗲𝗮𝗿 𝟮𝟬𝟮𝟯
— BCCI (@BCCI) January 25, 2024
It goes to none other than Virat Kohli! 👑🫡
Congratulations 👏👏#TeamIndia | @imVkohli pic.twitter.com/1mfzNwRfrH
ICC ने विराट कोहलीची वर्ष 2023 साठी ICC पुरुष वनडे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. कोहलीने 2023 मध्ये एकूण 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात कोहलीच्या बॅटमधून 1377 धावा झाल्या. याशिवाय कोहलीनेही एक विकेट घेतली.
कोहलीला विश्वचषकात नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. या काळात कोहलीने एक विकेटही घेतली होती. कोहलीची प्रत्येक क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन आयसीसीने या खेळाडूला या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
कोहली व्यतिरिक्त ICC ने मोहम्मद शमी आणि शुभमन गिल यांना देखील वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूसाठी नामांकित केले होते, परंतु आता ही भेट विराट कोहलीला देण्यात आली आहे.