पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यात मराठा समाज सर्वेक्षण आपलिकेशन ॲप द्वारे करण्यात येत आहे यामध्ये मराठा समाज खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करताना मुस्लिम समाजाबाबत मुस्लिम जात व इस्लाम धर्म असे समाविष्ट नसल्याने यामुळे मुस्लिम समाजातील खुल्या प्रवर्गातील मुस्लिम नागरिकांचा सर्वेक्षण होण्यामध्ये चूक होण्याची शक्यता असल्याने या ॲपमध्ये जात मुस्लिम व धर्म इस्लाम असे समाविष्ट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पातुर तालुका यांच्यावतीने करण्यात आली असून याबाबत पातुर तहसीलदाराला निवेदन देण्यात आले आहे.
सध्या मराठा आरक्षण सर्वेक्षण सुरू असून एका ॲपद्वारे सदर सर्वेक्षण करण्यात येते खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरिता 22 जानेवारी रोजी नियुक्त केलेल्या प्रगणण व सुपरवायझर यांना प्रशिक्षण देण्यात आले सदर सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश आहे.
या प्रशिक्षणात दाखविण्यात आलेल्या आपलिकेशन ॲप मध्ये मुस्लिम समाजाचा सर्वेक्षण करतेवेळी खुल्या प्रवर्गातील मुस्लिम समाजाची जात मुस्लिम व धर्म इस्लाम असे दाखवत नाही मुस्लिमांचे धर्म हा इस्लाम असून सदर बाब मराठा सर्वेक्षण ॲप मध्ये धर्म सुद्धा मुस्लिम दाखविता दाखविण्यात येत आहे.
यामुळे यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी कारण मुस्लिम समाजाची कोणत्याही प्रवर्गातील धर्म हा इस्लाम आहे यामुळे सदर सर्वेक्षण काम करताना मुस्लिम समाजाच्या सर्वेक्षणामध्ये माहिती माहिती देताना मुस्लिम समाजातील खुल्या प्रवर्गातील मुस्लिमांचे सर्वेक्षण होऊ शकत नाही व ही चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सदर माहिती भरताना जे आपलिकेशन ॲप मध्ये खुल्या प्रवर्गातील मुस्लिम समाजाचा धर्म इस्लाम व जात मुस्लिम दाखविण्याबाबत या सर्वेक्षण
ॲप मध्ये समाविष्ट करून मुस्लिम समाजावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी पातुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पातुर शहर अध्यक्ष सय्यद शाकीर हुसेन उर्फ गुड्ड पहेलवान
यांनी पातुर तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केली असून या एप्लीकेशन ॲप मध्ये तात्काळ राज्य शासनाने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे यावेळी पातुर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी नेते हिदायत खान का रूमखा उर्फ इद्दु पैलवान यांच्या शे चांद, मो.शाकीरभाई, ग्रामपंचायत सदस्य इरफान,सलामभाई,हसन खान,मो.महेताब, शब्बीर खान,अधिक पटेल.सै.नईम,शे मुख्तार, अनिल निमकडे.ग्रामपचायत फिरोजभाई, निखिल उपर्वट
सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा शिवसेनाचे (उध्दव ठाकरे गट) कार्यकर्ते उपस्थित होते.