Saturday, November 16, 2024
Homeराज्यहक्काचा आरक्षण मागतोय, भीक मागत नाही; पुण्यात भगवं वादळ लाखोचा समुदाय मुंबईच्या...

हक्काचा आरक्षण मागतोय, भीक मागत नाही; पुण्यात भगवं वादळ लाखोचा समुदाय मुंबईच्या दिशेने…

हातात झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, एक मराठा लाख मराठाच्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर भगव वादळ मुंबईत धडकणार.

राज्यातील धाराशिव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर ,सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून पदयात्रेत लाखो मराठा बांधवांचा सहभाग.

पुणे – जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है ! एक मराठा लाख मराठा ! आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे ! हर हर महादेव! अशा घोषणा देत मराठा बांधवांचा लाखोंचा समुदाय पुणे शहरात दाखल झाला होता.

शहरात अनेक चौकात जरांगे पाटलांच जंगी स्वागत करण्यात आलाय असंख मराठा बांधव आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईला चालले आहेत त्यांना आरक्षण द्यावेच लागेल आम्ही हक्काचा आरक्षण मागतोय भिक मागत नाहीये अशा प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिल्या आहेत.

सकाळी वाघोली पासून मोर्चाला सुरुवात झाली. हातात झेंडे, डोक्यावर भगवा टोप्या, एक मराठा लाख मराठा चा पताका, टाळ-मृदुंगाचा गजर करत नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत प्रमुख रस्त्यावरून मोर्चा जात असल्याने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते.

लाखोच्या संख्येने पुण्यात दाखल झालेल्या मराठा आंदोलका मुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शिवाजीनगर संचेती हॉस्पिटल परिसरात 100 किलोचा हार अर्पण करून तसेच फुलांची उधळण करून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. मोर्चात पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आला तसेच मराठा बांधवांच्या सुरक्षेची काळजी सुद्धा घेतलेली जात होती.

पुण्यातील गुंजन चौक ते तारकेश्वर रस्त्यावर मराठ्यांचं जोरदार वादळ हे डोळ्यात बसेनास होत. केवळ जरांगे पाटील यांची झलक पाहायला मिळावी हीच अनेक नागरिकाची इच्छा होती. लहान लेकरासह बायका जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या ,त्यात तरुणी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जय भवानी जय शिवरायाचा सतत गजर होत होता. प्रत्येकाला जरांगे पाटील यांची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपायची होती. त्यासाठी अनेकजण घरांवर व इतर जिथे जागा असेल तिथे उभे राहत होते जरांगे यांचा ताफा कित्येक किलोमीटर पासून दूर होतात तरी लोक पाहण्यासाठी हजर होते.

आरक्षण घेऊनच येणार; महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य घेऊन मराठ्यांची मुंबईच्या दिशेने वाटचाल आम्हीं वाहनांमधून महिनाभर पुरे इतके अन्नधान्य आणि साहित्य घेऊन निघालो आहे. त्यामध्ये स्वयंपाकासह कपडे, चादरी यांचा समावेश आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊनच वापस येणार असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केला.

एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्या सोबत आवश्यक वस्तूंचा साठा घेऊन ते मुंबईकडे निघाले आहेत. त्यामधील अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची संवाद साधला असता या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आरक्षण नसल्याने मुलांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.

त्यासाठी शेतातील कामे उरकून ते निघाले आहेत. तसेच जी काही थोडी कामे शिल्लक आहेत ती करण्याची जबाबदारी घरातील महिला मंडळींवर सोपवण्यात आली आहेत .जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्येच राहणार आहेत.

तसेच एक महिन्याचे रेशन संपल्यानंतर गावाकडून त्यांना सीधा पुरविण्यात येणार आहे. त्याबाबतची पूर्वकल्पना गावकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे कितीही दिवस लागले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय फिरणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.

मोर्चात नवी जोडपी सहभागी

काही नवी जोडपी मोर्चात सहभागी झाली आहेत. आपल्या लहान बाळाला घेऊन ते जरांगे पाटलांसोबत मुंबईला चालले आहेत. जर आरक्षण मिळाला तर आमच्या मुलाचे भविष्य उज्वल होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

संभाजी राजेच्या “स्वराज्य” पक्षातर्फे मनोज जरांगे पाटलांचे स्वागत
मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या संघर्ष होता मनोज जरांगे पाटलांचे स्वराज्याच्या वतीने स्वराज्य भवन पुणे येथे भव्य क्रेन ने हार घालून तलवार भेट देऊन स्वागत करण्यात आले.

गावागावातून चपाती, शेंगदाणा चटणी

पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली होती. खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साडेतीन हजार चपात्या ५० किलो शेंगदाण्याची चटणी ५० किलो लसणाची चटणी यांचे वाटप मराठा बांधवांना करण्यात आले. रांजणगाव – गणपती कोरेगाव परिसरातील सर्व गावात चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती.

पदयात्रा मार्गावरील गावातील महिलांमध्ये स्वयंपाकाची लगबग पहावयास मिळत आहे. समाजाच्या प्रगतीसाठी व लेकरांच्या भविष्यासाठी शहाणपणाची भूमिका घ्यावी लागेल. आपले शरीर सुद्धा साथ देत नसताना जातीसाठी, समाजासाठी जीवाची परवा न करता आंदोलन करत असून, पुणेकरांनी आरक्षणाच्या अंतिम टप्प्यातील लढाईसाठी मोठ्या संख्येने मुंबईत यावे व मराठा समाजाने आपल्यातील एकजूट कायम ठेवावी असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: