पातूर – निशांत गवई
पावन भूमी अयोध्या नगरीत दि.२२ जानेवारीला संपन्न झालेल्या प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळाचे औचित्य साधून पातूर येथे गुरुवार पेठ मधील तुळजाभवानी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच माऊली मित्र मंडळ यांच्या तर्फे संपूर्ण गुरुवारपेठ भागात आकर्षक रोषणाई, हार तोरण,भगव्या पताका,झेंडे बांधून,फटाक्यांची आतिष बाजी करत मनमोहक रांगोळ्या घालून आणी दिव्यांची आरास लावून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा अतिउत्साहात साजरा करण्यात आला.
दि.22 जानेवारीला दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी घंटानाद करून प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्तावर श्री राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होताच श्री दत्त आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र येथे माऊली मित्र परिवार यांचे वतीने होम यज्ञ व महाआरती करून 51 किलो मोतीचूर लाडू वाटप करून उत्सव साजरा करण्यात आला तसेंच सायंकाळी आई तुळजा भवानी संस्थान व भक्त परिवार यांच्यावतीने तुळजा भवानी मंदिरात जेष्ठ नागरिकांच्या हस्ते महाआरती करून 51 किलो खिचडी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
सोबतच विलास राऊत,रमेश काळपांडे,संजय राऊत यांच्या भजन मंडळांच्या वतीने भजन संध्या हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला नगरातील असंख्य नागरिकांसह माऊली मित्र मंडळाचे सदस्य डॉ.सचितानंद बोबंटकार,उमेश इंगळे,सचिन बारोकार,पप्पू सातव,अभिषेक गणोरकर,कन्हैय्या चिंचोळकर,अभी फाटे,योगेश इनामदार,सागर राखोंडे आदी उपस्थित होते.
महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आई तुळजाभवानी संस्थानचे सदस्य मार्गदर्शक निरंजन बोबंटकार,योगेश वालोकार,पत्रकार प्रदीप काळपांडे,विजय इंगळे,गजानन वानखडे, अनिल काळपांडे, डीगांबर बंड,छत्रपती गाडगे,प्रभुदास बोबंटकार,प्रवीण तायडे,सचिन बारोकार,सागर कढोणे,प्रवीण इंगळे,निशांत काळपांडे,
गणेश इंगळे,नंदन काळपांडे,सुनील गाडगे,सचिन पोपळघट,अवी काळपांडे,अजय इंगळे,ललित खंडारे,आदित्य इंगळे,शिव यादव,वैभव काळपांडे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी नगरातील असंख्य नागरिक तथा महिला भगिनी मोठया संख्येत उपस्थित होत्या.