Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayनागपूर । कारने दोन दुचाकीस्वारांना उडविले...दुचाकीस्वार थेट उड्डाणपूलावरून 70 फूट खाली कोसळले...चौघांचा...

नागपूर । कारने दोन दुचाकीस्वारांना उडविले…दुचाकीस्वार थेट उड्डाणपूलावरून 70 फूट खाली कोसळले…चौघांचा मृत्यू…

नागपूर शहरात काल रात्रीच्या दरम्यान कार आणि दुचाकीच्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला आहे. कार आणि दुचाकीचा हा भीषण अपघात नागपूरच्या सक्करदरा उड्डाण पुलावर झाला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या धडकेने दुचाकीवरुन प्रवास करत असलेले दुचाकीस्वार थेट उड्डाणपुलावरुन खाली कोसळले. या भयानक अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर हा अपघात झाला.

यात अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. दुचाकीवरील सर्वजण सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून उड्डाणपुलावरुन खालच्या रस्त्यावर फेकले गेले.

पोलिसांनी धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती कार मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकीवर चार लोक प्रवास करत होते. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश होता. ही कार आवारी चौकाकडून भांडे प्लॉट चौकाकडे जात होती. त्यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला कारने जबर धडक दिली. या धडकेत उड्डाणपुलावरुन कोसळून चौघांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: