मालेगाव – चंद्रकांत गायकवाड
काही पाळीव प्राणी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या गोपनीय माहिती वरून मालेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे व इतर सहकारी यांनी ट्रक चा पाठलाग करून त्याला अमानी गावा जवळ थांबवले.ट्रकच्या मागचे बंद फालके उघडले असता, त्यात गाई व इतर प्राणी जनावरे आढळून आले.
22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीराम च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व पावित्र्य राखल्या जावे म्हणून पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे विशेष काळजी घेत आहेत.
काल शुक्रवारी सकाळी मालेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे यांना मिळालेल्या एका गोपनीय माहिती वरून ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात,पोलीस कर्मचारी अमोल पवार, जितू पाटील, शिवा काळे, कोकाटे, सुनील पवार यांनी ट्रकचा पाठलाग करून त्याला अमानी गावाजवळ पकडले.
ट्रकचे मागचे बंद फाळके काढले असता, त्यात गाई व इतर पाळीव प्राणी असे एकूण ४९ जनावरं आढळून आली.ती सर्व जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे समजले.सदर कारवाई ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि.योगेश धोत्रे यांनी करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.