रामटेक – राजु कापसे
दिनांक १९ जानेवारी ते दिनांक २३ जानेवारी २०२४ या कालावधीत रामटेक महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दरम्यान प्रशासकिय स्तरावर विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्र वनविभाग नागपूर हे सुद्धा सहभागी असून वनविभागा मार्फत दिनांक २२ जानेवारी २०२४ ला ” प्रभु श्रीराम आणि रामटेक गडमंदीर परिसर, निसर्गरम्य रामटेक, रामटेक परिसरातिल ऐतिहासिक स्थळ” या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन नेहरू ग्राऊंड रामटेक येथे सकाळी ११ ते २ या वेळेत करण्यात येत असुन आपण सर्वांनी या स्पर्धेत उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवावा.
प्रथम क्रमांक विजेता रू ११०००/-, द्वितिय कमांक विजेता रू ७०००/- व तृतिय क्रमांक विजेता रु ५०००/- व प्रशस्ती प्रत्र आणि सर्व सहाभागी विद्यार्थ्यांना सहभागीता प्रमाणपत्र देण्यात येईल.
चित्रकाढण्यासाठी लागनारे सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे, काही अडचणी आल्यास क्षेत्र सहाय्यक बि.एन. गोमासे मो. ८२०८४५५९७१ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्यास रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी विनंती केली आहे.