मुंबई – गणेश तळेकर
लावणीसम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगांवकर यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ लावणीसम्राज्ञी विठा स्मृती चषक भव्य लावणी नृत्य स्पर्धा- पर्व चवथे २०२४ या स्पर्धेचे भव्य आयोजन टिटवाळा शहरात करण्यात आले होते… हि स्पर्धा वयोगट ५ ते १५ वर्षे आणि वयोगट १५ वर्षे आणि पुढील वयोगटातील स्पर्धकांसाठी विनामुल्य ठेवण्यात आली होती…
सदर स्पर्धेची अंतिम फेरी सोमवार दिनांक १५ जानेवारी, २०२४ रोजी टिटवाळा महोत्सवात पार पडली… ज्यात दोन्ही गटात अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रत्येकी १० स्पर्धकांनी सहभाग घेतला… लहान गटात प्रथम क्रमांक काव्या जठार (पेण) द्वितीय क्रमांक श्राव्या पाटणकर (दिवा) तर तृतीय क्रमांक इशिका सिंघ (बदलापूर) यांनी पटकावला… तसेच मुख्य गटात प्रथम क्रमांक प्राची मोहिते (लालबाग) द्वितीय क्रमांक नेहा जाधव (सावंतवाडी) तर तृतीय क्रमांक राहूल काटे (नाशिक) यांनी पटकावला… संपूर्ण स्पर्धेचे परिक्षण सन्माननीय परिक्षक उल्का दळवी,गौरी जाधव, सुजाता कांबळे, विद्या सदाफुले यांनी केले… सदर स्पर्धेचे सुत्रसंचालन विकास सोनावणे यांनी केले…
लावणीसम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगांवकर यांच्या स्मृतीदिनीच या स्पर्धेची अंतिम फेरी पाडली आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस या स्पर्धेच्या माध्यमातून लावणी कलावंत महासंघाच्यावतीने सांगितीक आदरांजली अर्पण करण्यात आली… सन्माननीय आयोजक विजयभाऊ देशेकर यांच्या मार्गदर्शनात लावणी कलावंत महासंघाचे जयेश चाळके, कविता घडशी, विशाल सदाफुले, योगिता मोर्जे आणि इतर पदाधिकारी यांनी सदर लावण्यसोहळा यशस्वी केला, अशी माहिती लावणी कलावंत महासंघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील यांनी दिली…