Saturday, November 16, 2024
Homeराज्यरामटेक तीर्थक्षेत्र विकास निधीचा बट्याबोळ...शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष...

रामटेक तीर्थक्षेत्र विकास निधीचा बट्याबोळ…शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष…

रामटेक – राजू कापसे

आज भारत देशात अध्यात्मिक,तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा विकासाने गती पकडली आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा, तीर्थक्षेत्राचा वाटा वाढत असताना रामटेक तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत खूप मागे गेला आहे.

रामटेक तीर्थक्षेत्र विकास निधी मधून १५० कोटी रुपये मंजूर झाले होते त्यातील फक्त ५० कोटी रुपये प्राप्त झाले व त्यातील फक्त ४० कोटी रुपयांची कामे झाली असून १० कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत मागील एक वर्षापासून अर्खचीत पडले आहेत.प्रशासकीय अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी रामटेक विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

नागपूर जिल्ह्यातीलच कोराडी,अंभोरा,अदासा, धापेवाडा,ताजबाग येथे कोटी रुपये उपलब्ध होत असताना रामटेकलाच विकासनिधी उपलब्ध होत नाही.आज सरकारमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीची सत्ता असताना सुद्धा रामटेक विकास निधीच्या बाबतीत आज ही वनवास का भोगत आहे असा प्रश्न आज रामटेक च्या जनतेच्या मनात निर्माण झाला असल्याचे माजी आमदार डी.मल्लिकार्जून रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेत रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी.मल्लिकार्जून रेड्डी,जिल्हा भाजपा उपाध्यक्ष डाॅ. राजेश ठाकरे,महीला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा वनमालाताई चौरागडे,पारशिवनी तालुकाध्यक्ष योगेश वाडीभस्मे,रामटेक मंडळ अध्यक्ष राहुल किरपान,देवलापार मंडळ अध्यक्ष संजय(बंटी)गुप्ता, जिल्हा परिषद सदस्य व्यंकट कारेमोरे,

जिल्हा किसान आघाडी जिल्हा महामंत्री लक्ष्मण केने, अनुसुचित जमाती जिल्हा महामंत्री सागर लोंढे,रामटेक शहर अध्यक्ष उमेश पटले,तालुका अनुसुचित जमाती अध्यक्ष संजय बिसमोगरे,विजय हटवार,युवा मोर्चा क्रीडा संयोजक सागर गावंडे,अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष करीम मालाधारी,अनुप राजूरकर,

नंदकिशोर कोहळे,सतीश वाडिभस्मे,विशाल चापले,अपलांख्याक तालुका महामंत्री फिरोज मालाधारी,भाजयुमो जिल्हा सचिव सचिन शिवणे आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: