Sunday, December 22, 2024
Homeराज्यविविध कामात शासकीय कर्मचारीच असल्यानेबिल वाढवणे व काढणे कंत्राटदारांना झाले सोपे...

विविध कामात शासकीय कर्मचारीच असल्यानेबिल वाढवणे व काढणे कंत्राटदारांना झाले सोपे…

बिलोली – संजय जाधव

तालुक्यातील शासनाच्या विविध निधीतून होत असलेल्या कामांमध्ये खुद्द शासकीय कर्मचारी व अधिकारीच अप्रत्यक्ष भागीदार असल्यामुळे कामांची गुणवत्ता तर ढासळली कसली तरी संबंधित कामांचे बिलं कमी जास्त करणे आणि बिलं काढणे आत्ता कंत्राटदारांसाठी सोपे झाले आहे.तर कामाच्या गुणवत्ता विषयी तक्रार झाल्यास स्वतः अधिकारी व कर्मचारीच अप्रत्यक्ष भागीदार असल्यामुळे चौकशी निष्पक्ष होईल याची आशा ही धूसर झाली आहे.

राज्य पातळीवरील गलिच्छ राजकारणामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली असून सध्या शासकीय अधिकारी यांच्याकडून ग्रामीण भागातील विकासाच्या कामात व विविध योजनेतील निधीच्या कामत अप्रत्यक्ष गुत्तेदारी करण्याचे प्रमान वाढले आहे.

त्यात विशेषतः याचे प्रमाण बिलोली तालुक्यात अधिक आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते व ग्रामपंचायत स्तरावरील कांही मोजक्या प्रस्थापित ग्रामसेवकांचा यात मोठा समावेश आहे.या अधिकारी व सुशिक्षित बेकार अभियंत्यावर मात्र संक्रात येत आहे.

सिव्हिल अभ्यंत्याचे शिक्षण पूर्ण करून बांधकाम व्यवसायाचे परवाना(लायसन्स) काढून या व्यवसायात करियर घडवणाऱ्या अभियंत्या कांही आमिष दाखवून लायसन्सचा वापर करत त्यांना फक्त नामधारी भागीदार ठेवत स्वतः गुत्तेदारी या अधिकाऱ्यांनी सुरु केली आहे.तर सुशिक्षित बेकार अभियंत्यांना हाताशी धरून प्रस्थापित गुतेदारांनाही भागीदारीसाठी वेठीस धरून त्यांच्यातही भागीदार मिळण्याचा गोरखधंदा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता व ग्रामसेवकांकडून केला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीला येणाऱ्या शासनाच्या विविध योजनेच्या निधीतून ज्या कामात चांगली मिळकत आहे त्या कामांना प्राधान्य संबधित अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.विशेषतः यात तालुक्यातील कांही मोजक्या ग्रामसेवकांचा समावेश आहे.प्राधान्य दिल्या जात असलेल्या कामात सिमेंट काँक्रेट रस्ते,नाली बांधकाम, पाणीपुरवठा,इलेक्ट्रिकल इत्यादी कामांचा समावेश आहे.

या कामांमध्ये स्वतः अधिकारीच अप्रत्यक्ष भागीदार असल्यामुळे केलेल्या कामाची गुणवत्ता तपासणी केली आणि काम निकृष्ट दर्जाचे झाले तरी तपासणीला खुद्द कंत्राटदार अधिकारीच व त्यांच्याच ताफ्यातील असल्यामुळे तक्रारी नंतर निष्पक्ष चौकशी होईल या बद्दल साशंकता आहे.काम कितीही निकृष्ट झाले तरी स्वतः कामात अप्रत्यक्ष भागीदार असल्यामुळे संबधित कामाचे बिलं काढणं ही आत्ता गुत्तेदारांना सोपे झाले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: