बिलोली – संजय जाधव
नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी ७५० कोटींची तरतूद झाल्याने रेल्वेमार्गाचा विषय निकाली निघाला.आत्ता बोधन बिलोली नरसी मुखेड शिरूर(ताजबंद) लातूर रेल्वे मार्गाची मागणी वाढू लागली आहे. या मार्गासाठीमाजी सनदी अधिकारी मधू गिरगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला नांदेड बिदर या रेल्वे मार्गासाठी शासनाने या आर्थिक वर्षात ७५० कोटी रुपयांची तरतूद केली असल्यामुळे हा मार्ग अंतिमतः निकाली निघाला आहे.आत्ता एकेकाळी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका राहिलेला परंतु विकासाच्या बाबतीत अतिशय मागास राहिलेल्या तालुक्याचा विकासाच्या अनुषंगाने आत्ता बोधन बिलोली नरसी मुखेड शिरूर(ताजबंद) लातूर हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून हालचाली चालू झाल्या आहेत.
तालुक्याचे भूमिपुत्र तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव गावंडे यांचे तत्कालीन स्वीय सहायक मधु गिरगावकर यांनी मुख्यमंमत्र्यांकडे बोधन बिलोली नरसी शिरूर ताजबंद ते लातूर हा रेल्वे मार्ग मंजूर करण्याची मागणी केली आहे.यावेळी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव तथा बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र बालाजी खतगावकर यावेळी उपस्थित होते.
विशेष म्हणजे बिलोली तालुक्याला एमआयडीसी मंजूर करून आणण्यात मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर व मधू गिरगावकर यांचा सिंहाचा वाटा आहे.