Sunday, December 22, 2024
Homeराज्यशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कन्हान व रामटेक येथे मोर्चा काढून...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कन्हान व रामटेक येथे मोर्चा काढून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा तीव्र निषेध…

रामटेक – राजु कापसे

शिवसेना आमदार अपात्रेच्या निकालावर काल सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अतिशय पक्षपाती निर्णय दिला. मा. सर्वोच्च न्यायालय यांनी अतिशय स्पष्ठ शब्दात कायद्याच्या चोकटीत राहून विधानसभा अध्यक्षांना अपात्र आमदार प्रकरणातील ‘न्यायवादी’ निर्णय घेण्यास सांगितले गेले.

परंतु नार्वेकरांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही सूचनेचे पालन न करता सूडबुद्धीने व संकुचित बुद्धीने निर्णय घेतला. हा निर्णय महाराष्ट्रालाच नव्हे तर लोकशाहीला सुद्धा घातक असा निर्यय आहे. या नार्वेकरांच्या निर्णयामुळे लोकशाही व संविधानाची हत्या झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा जाहीर निषेध केल्या जात आहे.

त्यावर आज रामटेक विधानसभा क्षेत्रातील कन्हान व रामटेक शहरात शिवसेना पक्षाच्या वतीने मोर्चा काढत नारे-निर्दशने करून नार्वेकरांचा जाहीर तीव्र निषेध करण्यात आला. या निषेध सभे दरम्यान शिवसेनेचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशाल बरबटे यांनी म्हटले कि, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना न्यायालयांनी ‘निपक्ष न्याय’ देण्यास सांगितले होते. परंतु सर्वाच्च न्यायालयाच्या कायद्याची चौकट आखून दिलेल्या सूचनेचे पालन केल्या गेले नाही.

या निकालामुळे महाराष्ट्राच्या जनतेत संतापाची लाट तयार झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे कि, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. संपूर्ण महाराष्ट्र ही भावना व्यक्त करीत आहे. आमची बाजू न्याय व सत्याची असून पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब सर्वोच्च न्यायालयात या बाबत नव्याने दाद मागतील.

अशी खुप संकटे शिवसेनेने बघितलेले आहे. याही संकटातून तावून-सुलाखून निघू अशी भावना व्यक्त करीत दिल्या गेलेल्या या निर्णयाचा शिवसेना (उ.बा.ठा.) रामटेक विधानसभा क्षेत्राच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.

या निषेध मोर्चा मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.देवेंद्र गोडबोले,पूर्व विदर्भ संघटक श्री.सुरेश साखरे, लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री.उत्तम कापसे,उपजिल्हा प्रमुख श्री.प्रेम रोडेकर,विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्री.सुत्तम मस्के, रामटेक विधानसभा सल्लागार प्रमुख श्री.अरुण बनसोड,रामटेक विधानसभा संघटक श्री.रमेश तांदुळकर,संघटिका सौ.दुर्गाताई कोचे,

रामटेक तालुका प्रमुख श्री.हेमराज चोखान्द्रे,पारशिवनी तालुका प्रमुख श्री.कैलास खंडार युवासेना जिल्हाप्रमुख श्री.लोकेश बावनकर,मौदा तालुका प्रमुख श्री.नरेश भोंदे,कन्हान शहर प्रमुख श्री.प्रभाकर बावणे,रामटेक शहर प्रमुख श्री.बादल कुंभलकर,उपशहर प्रमुख श्री.राहुल टोंगसे,उपतालुका प्रमुख सुनील सहारे,उपतालुका प्रमुख श्री.मोहन कोलवते,

विभाग प्रमुख इंद्रपाल बोरकर,पिंटू खंडार, विभाग प्रमुख राहुल वानखेडे,युवासेनेचे राहुल ढोबळे,विभाग प्रमुख प्रशांत लकडकर, कांद्री शहर प्रमुख श्री.सुरेश आंबिलडुके,श्याम मस्के,उपविभाग प्रमुख,दयाशंकर नागपुरे,विजय सोयाम,वनिता मेश्राम,प्रमिला शेंडे सह लोकसभा,विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: