Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनरामटेक विधानसभेत भाजयुमो तर्फे १२ जानेवारी ते २९ जानेवारी नमो चषकविविध कला,...

रामटेक विधानसभेत भाजयुमो तर्फे १२ जानेवारी ते २९ जानेवारी नमो चषकविविध कला, खेळ कार्यक्रमाचे आयोजन…

माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती

रामटेक – राजु कापसे

भारतीय जनता युवा मोर्चा रामटेक विधानसभा द्वारे रामटेक विधानसभा क्षेत्रातील गावोगावी नमो चषक आयोजित केले आहे.यात युवकांना आपल्या खेळ, कला गुणाचा प्रदर्शन करता येणार आहे.

१२जानेवारी ला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती,राष्ट्रीय युवा दिवसाला चषकाची सुरवात रामटेक च्या गांधी चौकात मॅरेथॉन स्पर्धा ला मान्यवरांचा हस्ते हिरवा झेंडा दाखवून होणार आहे.प्रत्येक खेळाला रोख पारितोषिक व शिल्ड वितरण करण्यात येईल.

खेळांचे आयोजन १२ जानेवार ला रामटेक येथे मॅरेथॉन,१५ जानेवारी कन्हान येथे रस्सीखेच,१६ जानेवारी कन्हान येथे गायन स्पर्धा,२३/२४ जानेवारी पारशिवनी येथे कब्बडी स्पर्धा,२५ जानेवारी नगरधन येथे कुस्ती स्पर्धा,२६ जानेवारी देवलापार येथे सायकलिंग स्पर्धा,२७ जानेवारी रामटेक येथे क्रिकेट स्पर्धा,२८ जानेवारी चाचेर येथे खो खो स्पर्धा,२९ जानेवारी कन्हान येथे नृत्य स्पर्धा तसेच रामटेक येथे रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे.या विविध खेळाचा कार्यक्रमात रामटेक क्षेत्रातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान माजी आमदारा डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी केली.

पत्रकार परिषदेत रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदारा डी.मल्लिकार्जून रेड्डी, रामटेक विधानसभा विस्तारक मनोज चौरे,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री नंदकिशोर चांदणखेडे, जिल्हा उपाध्यक्ष आलोक मानकर, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला, रामटेक शहर अध्यक्ष शुभम बिसमोगरे,नंदकिशोर कोहळे,करीम मालाधारी,देवदत्त तांडेकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: