Suchana Seth : उत्तर गोव्यातील कळंगुट परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या चार वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे. आपल्या मुलाने वडिलांना भेटू नये म्हणून तिने हा गुन्हा केला. पोलिसांनी आरोपी आईला सोमवारी 8 जानेवारी अटक केली. सुचना सेठ नावाची आरोपी महिला बेंगळुरूमधील एआय स्टार्टअपमध्ये सीईओ म्हणून काम करते.
आरोपीने प्रथम गोव्यात तिच्या 4 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या केली आणि नंतर ती त्याचा मृतदेह एका पिशवीत टाकून बेंगळुरूला पळून जात होती, तेव्हा पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांनी चित्रदुर्गात सुचनाच्या बॅगची झडती घेतली आणि मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर तिला अटक केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपी महिलेची कसून चौकशी करत आहेत.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने हा भयंकर गुन्हा तिच्या माजी पतीला भेटू नये म्हणून केला. सुचना सेठने 2010 मध्ये तिच्या माजी पतीसोबत लग्न केले. आरोपी महिलेने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. मात्र, पतीसोबत वाद झाल्यानंतर 2020 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी न्यायालयाने मुलाच्या वडिलांना दर रविवारी भेटता येईल, असा निकाल दिला. यावर सुचना अजिबात खुश नव्हती.
सुचना आपल्या पतीपासून मुक्त झाली असली तरी आपल्या मुलाने आपल्या वडिलांना भेटावे असे तिला अजिबात वाटत नव्हते. याच कारणामुळे आरोपी महिलेने आपल्या मुलाला वडिलांना भेटण्यापासून रोखण्याचा कट रचला होता. तिची योजना पूर्ण करण्यासाठी, ती 6 जानेवारीला गोव्यात पोहोचली आणि सिन्क्वेरिममधील हॉटेलमध्ये चेक इन केली. 7 जानेवारी रविवार असल्याने वडील आपल्या मुलाला भेटणार होते पण त्याआधी सुचनाने हॉटेलच्या खोलीत मुलाची निर्घृण हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचना सेठने आपल्या मुलाचा धारदार शस्त्राने खून केला. गुन्हा केल्यानंतर तिने हॉटेल व्यवस्थापनाला बेंगळुरूला परत जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्यास सांगितले. या महिलेने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे आग्रह धरला की, ती रस्त्यानेच बेंगळुरूला जाईल. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी कॅब बुक केली आणि ती तिचे सामान घेऊन निघून गेली. मात्र, हॉटेलचे कर्मचारी तिची खोली साफ करण्यासाठी आले असता त्यांना बेडवर रक्ताचे डाग दिसले.
येथे काही मोठी घटना घडल्याचा संशय हॉटेल कर्मचाऱ्यांना आला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ हॉटेल गाठून सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. फुटेज तपासले असता ती हॉटेलमधून एकटीच बाहेर पडल्याचे दिसून आले, तर तिचा मुलगा तिच्यासोबत कुठेही दिसला नाही. पोलिसांना लगेचच काही मोठा अनुचित प्रकार घडल्याचा संशय आला.
पोलिसांनी तात्काळ हॉटेलच्या कर्मचार्यांकडून कॅब चालकाचा नंबर घेतला आणि सुचना यांच्याशी बोलले. यावेळी सुचनाने सांगितले की, तिचा मुलगा गोव्यात तिच्या एका नातेवाईकाकडे आहे. त्याच्या नातेवाईकाचा पत्ताही तिने पोलिसांना दिला. मात्र पोलीस तपासात ही कथा पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. कळंगुट पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, आम्हाला सुचनाबाबत संशय आल्याने आम्ही चालकाला फोन करून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले.
यानंतर महिलेला बेंगळुरूला घेऊन जात असताना ड्रायव्हरने चित्रदुर्गातील पोलिस स्टेशनमध्ये कॅब थांबवली आणि या प्रकरणाची माहिती दिली. येथे चित्रदुर्ग पोलिसांनी सुचनाची बॅग तपासली असता त्यात तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, महिलेला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक कर्नाटकला रवाना झाले आहे.
Visuals of Bengaluru start-up founder Suchana Seth being taken into police custody after she was arrested for allegedly murdering her 4-year-old son.
— NDTV (@ndtv) January 9, 2024
Read here: https://t.co/iYaP0XTPqC pic.twitter.com/y2h9GTwKOd