IND vs AFG : दक्षिण आफ्रिकेच्या प्रदीर्घ दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला आता मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दिसणार नाहीत.
दोन्ही स्टार खेळाडू जखमी झाले आहेत. तर सिराज आणि बुमराह यांना विश्रांती मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेतून टी-20 संघात पुनरागमन करू शकते.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यानंतर 14 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर दोन्ही संघ दुसऱ्या T20 मध्ये आमनेसामने येतील. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T20 सामना 17 जानेवारीला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांनी स्वतःला T20 फॉरमॅटसाठी उपलब्ध घोषित केले आहे. रिपोर्टनुसार, कोहली आणि रोहितने टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निवड समितीची शुक्रवारी बैठक होत आहे. विराट आणि रोहितने टी-20 फॉरमॅट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात येईल, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तर मोहम्मद शमी देखील या मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाही.
भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20- 11 जानेवारी- मोहाली
दुसरा T20- 14 जानेवारी- इंदूर
तिसरा T20- 17 जानेवारी- बेंगळुरू