Friday, October 18, 2024
Homeराज्यराजपुरी गावच्या कचऱ्याची भयानक दुर्गंधीग्रामस्था कडून क्लिप वायरल; श्रीकांत सुर्वे...

राजपुरी गावच्या कचऱ्याची भयानक दुर्गंधीग्रामस्था कडून क्लिप वायरल; श्रीकांत सुर्वे…

पनवेल – किरण बाथम

नववर्ष स्वागत सर्वत्र होताना जंजिरा किल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना पैसे देऊन घाणीचा सामना करावा लागत आहे. राजपुरी मधीलच एका जागृत ग्रामस्थाने स्वतःच्या आवाजात याबद्दल एक क्लिप सोशल मीडियावर वायरल केली.

याबाबतीत मुरुड पर्यटन महोत्सव समितीचे श्रीकांत सुर्वे यांनी प्रखर टीका केली आहे. राजपुरी ग्रामपंचायत पर्यटकांच्या पार्किंगचे पैसे घेतात. पण सुविधाच्या नावाने नेहमीच बोंबा असतात.

मुरुड-जंजिरा पर्यटन विकासासाठी आमदार महेंद्र दळवी भरघोस प्रयत्न करत आहेत. पण असे प्रकार पर्यटनास मारक असल्याची भावना पर्यटक देखील मांडतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: