रामटेक – राजु कापसे
रामटेक – विद्यार्थ्याचा शारिरीक विकास व सांधिक विकास करण्याच्या मुख्य हेतुने जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, पिपरीया येथे केंद्र पिपरीया अंतर्गत येणार्या सर्व जिल्हा परिषद शाळांची क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
केंद्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन श्रीमती शांताताई कुंभरे जि. प. सदस्य यांनी केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कोडवते, पं. समिती सदस्य रामटेक हे होते. केंद्रीय क्रीडा स्पर्धेत प्रास्तविक श्री रामनाथजी धुर्वे यांनी केले.
सरद कार्यक्रमाला श्री प्रविणजी उईके सरपंच, श्री भीमरावजी वाळके उपसरपंच, व सर्व ग्राम पंचायत सदस्य , पिपरीया व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुभाषजी थोटे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. केंद्रीय क्रीडा स्पर्धा योग्यरीत्या संपन्न होण्याकरीता केंद्राचे केंद्र प्रमुख श्री रामनाथ धुर्वे , जि. प. प्राथमिक शाळा पिपरीया च्या मुख्याध्यापिका सौ रुपाली कोचे तसेच शाळेतील शिक्षक – कर्मचारी यांनी उत्तम नियोजन करण्यात आले.
केंद्रीय क्रीडा स्पर्धा समारोह कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रविन शिंगारे यांनी उत्कृष्ठरीत्या केले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन सौ रुपाली कोचे यांनी करुन वंदे मातरम गीताने स्पर्धा परीक्षेचे समापन करण्यात आले.