हिंगणा – शरद नागदेवे
स्व. देवकीबाई बंग इंग्रजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणा येथे नवीन वर्षाच्या पर्वावर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका अरुणा महेश बंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
मेळाव्यात वर्ग 9 वी च्या स्काऊट गाईड विद्यार्थी व वर्ग ११वी च्या विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल लावले होते. कार्यक्रमात पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती त्यांच्यासाठी हाउजी गेम घेऊन विद्यार्थांना बक्षिस वितरण करण्यात आले तसेच इतर मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता तुपेकर व सोनंम लारोकर यांनी तर आभार अतुल कटरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.