हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द करा; वाहन चालक संघटनेची मागणी…
अहेरी – मिलिंद खोंड
केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन ” कायदा पारित केला असुन या कायद्यामुळे अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे.
अपघात घडल्यास जखमीना मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे, त्यामुळे कोणताही वाहन चालक अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करुन एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात.
परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो.त्यामुळे स्वत:च्या संरक्षना करीता काही वाहन चालक घटनास्थळावरून पळ काढतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना “हिट अँड रन” कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे.
असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे, ज्यामुळे ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा आहे. हा कायदा केन्द्र सरकारने तात्काळ रद्द करावा या करीता अखील महाराष्ट्र वाहन चालक संघटना अहेरी,आलापल्लीच्या वतिने मौजा आलापल्ली येथील विर बाबुराव सडमेक चौकात बुधवार दिनांक 03/01/2024 ला सकाळी 10.00 पासुन केन्द्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आले.
लोकशाहीच्या मार्गाने काही काळ रस्ता रोको करुन केन्द्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले व जर का केन्द्र सरकारने हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द न केल्यास येत्या काळा तिव्र आंदोलन करणार असल्याचे वाहन चालकानी सांगीतले.या वेळी अखील महाराष्ट्र वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळु बांगरे,सचिव प्रविन उईके,यांनी आंदोलनात पुढाकार घेतला यावेळी माजी राज्यमंञी श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी वाहन चालकाचे समस्या जाणुन घेतले व केन्द्र सरकारला सदर कायदा रद्द करण्या सबंधाने आश्वासन दिले.
तसेच निषेध सभेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यानी आंदोलना स्थळी भेट दिली व भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी जाहीर पाठींबा दर्शविला.यावेळी आंदोलन कर्ते वाहन चालक राहुल शुक्ला ,संदीप मडावी,प्रविन लिंगनवार,तुकाराम धुर्वे,नागेश मारेन,प्रशांत अलगमकार,अनिल पुलगमकार,विशाल मडावी,
किशोर मंटकवार,विठ्ठल गेडाम,श्रीनिवास कनमवार,गणेश सोनकरस,पंकज साव,राहुल सिंघ,हिरालाल जाधव,आनंदभाई,पवन गोसावी,सर्वेश गोसावी,निशाद मसरामसुभाष राम,अशोक खोब्रागडे,नंदकुमार डोके,सागर हिचामी,दुशांत पेंदाम,प्रफुल रोहनकर,परवेश पठान,शरद झाडे,राजु गावडे,राहुल डोके,शंकर चांदेकर,सुनिल एकोनकार,संजय हिचाम क्रिष्णा गावडे यासह निषेध सभेला अहेरी तालुक्यातील असंख्य वाहन चालक उपस्थीत होते.