Sunday, December 22, 2024
Homeराज्य२०२४ ची जय्यत तयारी साठी भारतीय जनता युवा मोर्चा आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राची...

२०२४ ची जय्यत तयारी साठी भारतीय जनता युवा मोर्चा आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राची प्रमुख पदाधिकारी बैठक संपन्न…

जास्तीत जास्त लोकांनी या नमो चषकचा लाभ घ्यावा…..आजचा युवा हा उद्याचा भविष्य आहे,भाजपा युवा मोर्चा ने नमो चषक 2024 चा नमो चषक म्हणजे समाज कार्य करण्याचे व्रत आहे…….गाव तिथे युवा मोर्चा हा संकल्प करा ओम कटरे…..

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

( गोंदिया ) दिनांक 02/01/2024 रोज मंगळवारला भाजपा कार्यालय सालेकसा येथे आमगाव-देवरी विधानसभा प्रमुख कार्यकर्ता पदाधिकारी बैठक भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष ओम कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून प्रमुख मार्गदर्शन युवा मोर्चा चे जिल्हा महामंत्री आदित्यजी शर्मा, इंद्रजित भाटीया,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कमलेश चुटे,आकाश बिसेन,

सालेकसा तालुका अध्यक्ष देवरामजी चुटे,देवरी तालुका अध्यक्ष नितेश वालोदे,आमगाव तालुका अध्यक्ष शुभम पुंड,शहर अध्यक्ष राम चक्रवर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भाजपा युवा मोर्चा सालेकसा चे महामंत्री अरविंद फुंडे,गौरीशंकर टेंभरे,कवलचंद दसरीया,देवरी तालुका महामंत्री योगेश ब्राह्मणकार,युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी निलेश उपराडे,प्रतीक लिल्हारे,हितेश मेश्राम,

चमनलाल हटवार,झामसिंग मानकर, विशाल दसरिया,अजित डोये,रवींद्र बिसेन,श्रीधर शिवणकर,मिखिलेश दमाहे,योगेश बहेकार,संजय ऊईके,अतुल निमकर,राज लिल्हारे,,हितेश ठेंगडे,बबलू कोरे,अतुल पटले,कैलास बोपचे,कार्तिक पटले,राजेश लिल्हारे,दशरथ नागपुरे,रोहित गभने,सोहम रहांगडाले, भाजपा युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी युवा मोर्चाची जवाबदारी काय आहे,

त्यानी काय करावे,नमो चषक 2024 हा यशस्वी कसा करावा,जास्तीत जास्त लोकांनी या चषकाचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दल सांगितले,गाव तिथे युवा मोर्चा हा संकल्प करावा, कार्यक्रमाचे संचालन देवराम चुटे, तर आभार अरविंद फुंडे यांनी मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: