Sunday, December 22, 2024
HomeMarathi News TodayTruck Drivers Protest | ट्रक, टँकर चालकांचा संप मिटला...चालकांना सरकारने काय आश्वासन...

Truck Drivers Protest | ट्रक, टँकर चालकांचा संप मिटला…चालकांना सरकारने काय आश्वासन दिले?

Truck Drivers Protest: हिट अँड रन कायद्याविरोधात सुरू असलेला ट्रक चालकांचा संप अखेर मागे घेतला आहे. कर्मचारी तातडीने कामाला लागतील यावर सरकार आणि वाहतूकदारांचे एकमत झाले आहे. नवा नियम अद्याप लागू झाला नसून चर्चेनंतरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी बोललो आहोत. नवीन नियम अजून लागू झालेला नाही, असे सरकारला म्हणायचे आहे. भारतीय न्यायिक संहिता 106/2 लागू करण्यापूर्वी आम्ही ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

भारतीय न्याय संहितेनुसार, हिट अँड रन प्रकरणांमध्ये, नवीन नियमात 10 वर्षांचा तुरुंगवास किंवा 7 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. यापूर्वी दोन वर्षे कारावासाची शिक्षा होती. या नियमाविरोधात ट्रकचालकांनी निदर्शने करत हा कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली होती.

सरकारकडून आश्वासन मिळताच सर्वच राज्यामध्ये टँकरमधून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरू झाला आहे. ट्रक चालकांच्या या संपाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर पडला होता. कुठे पेट्रोल होतं तर कुठे नाही, कुठे भाजीपाला मिळाला तर कुठे नाही, कुठे डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका चालू शकल्या नाहीत. सोबतच पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडला होता.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: