Saturday, December 21, 2024
HomeBreaking NewsJapan | जपानमध्ये लँडिंग करताना विमानाला लागली आग...काय आहे ३७९ प्रवाशांची स्थिती?...

Japan | जपानमध्ये लँडिंग करताना विमानाला लागली आग…काय आहे ३७९ प्रवाशांची स्थिती?…

Japan : सध्याच्या घडीला जापान देश मोठ्या नैसर्गिक तसेच अपघाती आपत्तीला तोंड देत आहे. तर आता लँडिंग करताना विमानाला आग लागली. टोकियो विमानतळावर ही घटना घडली. हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जपानी वृत्तसंस्था NHK ने अपघाताबाबत मोठी माहिती दिली आहे. एनएचकेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, विमान लँडिंगनंतर दुसऱ्या विमानाला धडकल्याने आग लागल्याचा संशय आहे.

अनेक परदेशी माध्यमांनी या घटनेचे फुटेज प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये विमानाची खिडकी स्पष्ट असून तिच्या खालून ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत.

जपानी मीडियानुसार आग लागलेल्या फ्लाइटचा नंबर JAL 516 होता आणि या फ्लाइटने होक्काइडो येथून उड्डाण केले होते. जपान एअरलाइन्स फ्लाइट 516 जपानी स्थानिक वेळेनुसार 16:00 (04:00) वाजता न्यू चिटोस विमानतळावरून निघाली आणि 17:40 (05:40) वाजता हानेडा येथे उतरणार होती.

अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या घटनेच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, किती लोक जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

दरम्यान, जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एकूण 367 लोकांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याच वेळी, जपान तटरक्षक दलाने सांगितले आहे की जेएएल 516 ची टक्कर झालेल्या विमानातील पाच क्रू सदस्य बेपत्ता आहेत, वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: