UPI : आजकाल दैनदिन व्यवहारात UPI चा मोठा प्रमाणात वापर होत आहे, तुम्ही जर UPI ॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने Gpay, Paytm, Phonepe आणि BharatPe सारख्या सर्व UPI ॲप्सना निष्क्रिय, खाते बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या लोकांनी गेल्या एक वर्षापासून त्यांचा UPI आयडी वापरला नाही, त्यांची UPI खाती बंद केली जातील. ३१ डिसेंबरनंतर सर्व कंपन्या अशी खाती बंद करण्यास सुरुवात करतील.
ट्रायच्या (TRAI) आदेशानुसार, दूरसंचार कंपन्या 90 दिवसांनंतर दुसऱ्या वापरकर्त्याला निष्क्रिय केलेले सिम कार्ड जारी करू शकतात. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने 90 दिवसांपर्यंत नंबर वापरला नाही तर तो दुसऱ्या व्यक्तीला दिला जाईल.
जेव्हा तोच क्रमांक बँकेशी संबंधित असतो आणि वापरकर्त्याने त्याचा नवीन क्रमांक बँक खात्यासोबत अपडेट केला नाही तेव्हा समस्या उद्भवते. काय होईल तो नंबर ज्याला मिळेल तो UPI ॲप्स त्याच्या मदतीने सक्रिय करेल कारण तोच नंबर बँकेशी जोडलेला आहे. या समस्येपासून लोकांना वाचवण्यासाठी NPCI ने UPI ॲप्सला गेल्या एक वर्षापासून निष्क्रिय असलेली सर्व खाती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे परिपत्रक TPAP आणि PSP बँकांना UPI आयडी, संबंधित UPI क्रमांक आणि एक वर्षापासून UPI ॲपद्वारे कोणतेही आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार न करणाऱ्या ग्राहकांचा फोन नंबर ओळखण्याचे निर्देश देते.
NPCI ने अशा ग्राहकांचा UPI आयडी आणि UPI नंबर इनवर्ड क्रेडिट व्यवहारांपासून ब्लॉक करण्यास आणि UPI मॅपरवरून त्यांची नोंदणी रद्द करण्यास सांगितले आहे. इनवर्ड क्रेडिट व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या UPI ॲपवर पुन्हा नोंदणी करावी लागेल आणि त्यांचा UPI आयडी लिंक करावा लागेल.