Sunday, December 22, 2024
HomeSocial TrendingViral Video | वाघ घराच्या भिंतीवर आराम करत होता...संपूर्ण गाव त्याला पाहण्यासाठी...

Viral Video | वाघ घराच्या भिंतीवर आराम करत होता…संपूर्ण गाव त्याला पाहण्यासाठी…

Viral Video : उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये रात्री उशिरा वाघ जंगलातून बाहेर आला आणि लोकवस्तीच्या परिसरात घुसला. यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. हा वाघ घराच्या भिंतीवर चढून आरामात बसला. वाघाला भिंतीवर विसावल्याचे पाहून भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याने ग्रामस्थ सावध झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा वाघ पिलीभीत जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून बाहेर आला आणि रात्री काली नगर भागातील अटकोना गावात पोहचला. वाघाची बातमी आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर भिंतीवर झोपलेल्या वाघाचे दर्शन पाहण्यासाठी गर्दी जमली.

वाघाने गावातील रहिवाशांना रात्रभर जागे केले आणि स्वतः भिंतीवर झोपून राहिला. घरात वाघ असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र अद्याप वाघ पकडला गेला नाही.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे. वनविभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे जंगलातून वाघ घरात घुसू लागले आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाघाने माणसावर हल्ला केल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पिलीभीत हे व्याघ्र प्रकल्प असून जिल्ह्यात चार महिन्यांत वाघांच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 2015 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून वाघांच्या हल्ल्याच्या किमान चार डझन घटनांची नोंद झाली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: