Monday, September 23, 2024
Homeमनोरंजनडिजिकोअर स्‍टुडिओजचा नवीन शो 'कैसे बनता है'...

डिजिकोअर स्‍टुडिओजचा नवीन शो ‘कैसे बनता है’…

प्रख्‍यात ब्रॅण्‍ड्सच्‍या उत्‍पादन निर्मितीमधील पडद्यामागील बाबींचा होणार उलगडा

मुंबई – गणेश तळेकर

डिजिकोअर स्‍टुडिओज पुन्‍हा एकदा त्‍यांचा आगामी शो ‘कैसे बनता है’सह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहे. हा शो जिओ सिनेमावर प्रसारित होणार आहे. शोच्‍या या सीझनमध्‍ये ८ एपिसोड्सचा समावेश असून दर आठवड्याला २ एपिसोड्स प्रसारित केले जातील.

ही अद्वितीय सिरीज प्रेक्षकांच्‍या माहितीसाठी प्रख्‍यात ब्रॅण्‍ड्सच्‍या उत्‍पादन निर्मितीमधील पडद्यामागील बाबींना दाखवते. या शोमध्‍ये टायटन आयप्‍लस, फॅबर-कॅसल, पॅरागॉन, अॅमरॉन आदींच्या मनोरंजनपूर्ण कथा दाखवल्‍या जातील.

गुंतवणूकीमध्‍ये प्रेक्षकांच्‍या सहभागासंदर्भात क्रांतिकारी बदल घडवून आणलेला ब्‍लॉकबस्‍टर एंजल इन्‍व्‍हेस्‍टमेंट शो ‘इंडियन एंजल्‍स’च्‍या यशाला अधिक पुढे घेऊन जात शो ‘कैसे बनता है’चा उत्‍पादनाच्‍या गुंतागूंतीला सादर करण्‍याच्‍या माध्‍यमातून मनोरंजनाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे.

‘हाऊ इट्स मेड’ आणि ‘मेगाफॅक्‍टरीज’ अशा जागतिक स्‍तरावरील सुपरहिट शोजमधून प्रेरणा घेत ही सिरीज दैनंदिन उत्‍पादनांच्‍या निर्मितीसंदर्भातील सर्वोत्तम माहिती देण्‍याची खात्री देते.

डिजिकोअर स्‍टुडिओजचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिषेक मोरे म्‍हणाले, “आमचा शो अविश्‍वसनीय कार्याला प्रकाशझोतात आणण्‍याचा प्रयत्‍न करतो, ज्‍याला उत्‍पादनासंदर्भात गृहीत धरले जाते. आपल्‍या देशामध्‍ये उत्‍पादित केल्‍या जाणाऱ्या उत्‍पादनांचा अभिमान वाटावा अशी भावना निर्माण करण्‍याचा आमचा मनसुबा आहे आणि आम्‍ही त्‍याबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.

हे तुमच्‍या आवडत्‍या गोष्‍टींच्‍या पडद्यामागील कथांचा शोध घेण्‍यासारखे आहे, ज्‍यामधून त्‍यांना स्‍पेशल करणारी अथक मेहनत आणि बारीक-सारीक बाबींकडे देण्‍यात आलेले अवधान दिसून येते. आम्‍ही आशा करतो की, तुम्‍हाला या दैनंदिन वस्‍तू नवीन लुकमध्‍ये पाहायला मिळतील आणि तुमच्‍यामध्‍ये भारतातील उत्‍पादन क्षेत्राबाबत उत्‍सुकता निर्माण होईल.”

शो ‘कैसे बनता है’ विविध उत्‍पादनांच्या निर्मितीमधील गुंतागूंतीच्‍या प्रक्रियांना दाखवेल, ज्‍यामध्‍ये तंत्रज्ञान, दर्जा, व्‍यवस्‍थापन अशा पैलूंचा समावेश आहे. शोची संकल्‍पना प्रेक्षक आणि त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनाशी निगडित वस्‍तूंच्‍या दरम्‍यान सखोल संबंधाला चालना देण्‍याच्‍या अवतीभोवती फिरते.

प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये होस्‍टद्वारे नेतृत्वित लक्षवेधक प्रवास पाहायला मिळेल, तसेच प्रचलित वस्‍तूंमागील रहस्‍य व कारागिरीचा उलगडा होईल. वैयक्तिक फॅक्‍टरी गाथा, उत्‍पादन गुंतागूंती आणि सर्वसमावेशक क्षणांच्‍या संयोजनाचा अद्वितीय व्‍युईंग अनुभव निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे, जो ‘कैसे बनता है’साठी अद्वितीय असेल.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: