रामटेक – राजू कापसे
१६ डिसेंबर ला सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना ,मालवण नगर परिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ८०६ स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत रामटेक मधून ३ की.मी. पोहण्याच्या स्पर्धेत सृष्टी सौंदर्य बहुउद्देशिय संस्थेच्या हेमंत रेवस्कर , डॉ बापू सेलोकर, ऋषीकेश किंमतकर, दुर्वेश शेंडे आणि १ की.मी. मध्ये भार्गव मोकादम यांनी भाग घेऊन स्पर्धा पूर्ण करण्यात यशस्वी राहीले.
स्पर्धा ६ वर्षाच्या मुलापासून तर ७० वर्ष वयाच्या व्यक्ती पर्यंत स्त्री आणि पुरुष विविध गटात घेण्यात आली होती. अर्धा की.मी. अंतर पासून १० की.मी. पर्यंत वयोगट नुसार होते.
स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश विचारला असता स्पर्धकानी सांगितले की उत्तम आरोग्यासाठी पोहणे आवश्यक आहे. समुद्राची भीती मनातून जावी त्याचप्रमाणे शहरातील जलतरण पटुंनी यात भाग घ्यावा ही इच्छा व्यक्त केली. पाण्यात होणाऱ्या दुर्घटनेपासून स्वतः चा व दुसऱ्याच्या जीव वाचविण्यासाठी ही कला अवगत असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
या स्पर्धकांच्या मदतीसाठी राजेश बाकडे, वेदप्रकाश मोकदम, सारंग पंडे आणि डॉ रामचंद्र जोशी यांनी परिश्रम घेतले.
ऋषिकेश किमतकर म्हणाले की समुद्रातिल खारे पानी व तिथे असणारे जेली फीस यांच्या त्रास झाला. जेली फीस अनेकांना चावली व तुरंत एलर्जी झाली तरी न घबरता स्पर्धा पूर्ण केली.