Sunday, January 5, 2025
Homeराज्यअन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालक मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षता...

अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालक मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षता खाली जिल्हा नियोजन समितीची सभा २३ डिसेंबरला…

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

गोंदिया जिल्हा नियोजन समितीची सभा मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा धर्मरावबाबा आत्राम यांचे अध्यक्षतेखाली शनिवार 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित केलेली आहे.

जिल्हा नियोजन समिती सभा 27 ऑक्टोबर 2023 च्या इतिवृत्तास मंजुरी देणे. जिल्हा नियोजन समिती सभा 27 ऑक्टोबर 2023 च्या इतिवृत्तातील कार्यवाही मुद्यांच्या अनुपालन अहवालास मंजुरी देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा माहे नोव्हेंबर 2023 अखेर पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेणे (सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना/ओटीएसपी योजना).

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 च्या पुनर्विनियोजनास मंजुरी देणे (सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना/ओटीएसपी योजना). जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे. अध्यक्ष महोदयांचे परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय. या सभेस सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी अद्ययावत माहितीसह नियोजित वेळेपूर्वी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: