Sunday, December 22, 2024
Homeराज्यसरपंच, ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर ग्राम रोजगार सेवकांची जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनासह जोरदार...

सरपंच, ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर ग्राम रोजगार सेवकांची जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनासह जोरदार निदर्शने…

सांगली – ज्योती मोरे

ग्रामपंचायत चालवणाऱ्या सरपंच सदस्य ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक इत्यादींच्या विविध मागण्यांसाठी 18 डिसेंबर पासून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सांगली जिल्हा परिषदेसमोर जोरदार भरणे आंदोलन करण्यात आलंय.

गेल्या तीन दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींचं कामकाज बंद ठेवण्यात आलंय.यामध्ये सरपंचांचे मानधन वाढलं पाहिजे सहज विभागातून सरपंचांची आमदार म्हणून निवड झाली पाहिजे,यासह ग्रामसेवकांना जुनी पेन्शन मिळावी,ग्राम विस्तार अधिकारी हे पद रद्द करण्यात पंचायत विस्तार अधिकारी असं करण्यात यावं,डाटा ऑपरेटर चा पगार 12000 करण्यात यावा, रोजगार सेवकांना आकृतीबंधात घ्यावं यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: