Sunday, December 22, 2024
Homeराज्यशिवसेचे नेते, खासदार मा.श्री.अनिल देसाई यांची रामटेक व पारशिवनी येथील शिवसेना कार्यालयाला...

शिवसेचे नेते, खासदार मा.श्री.अनिल देसाई यांची रामटेक व पारशिवनी येथील शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट…

रामटेक – राजु कापसे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, राज्यसभा खासदार मा. श्री. अनिल देसाई साहेब यांची रामटेक विधानसभेतील रामटेक व पारशिवनी येथील रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशालजी बरबटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांसोबत पुढील होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच पक्ष संघटनांबाबत साधक बादक चर्चा केली.

रामटेक विधानसभा हा आपल्या पक्षासाठी आस्थेचा विषय असून येथील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्याचे काम करा, सरकारच्या फसव्या योजनांमुळे जनता अत्यंत नाराज असून त्यांना पुढील निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देणार आहेत.

त्यामुळे आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी संपूर्ण ताकदीने कामाला लागायला हवे. रामटेक विधानसभा मतदार संघ व येथील जनता ही आदरणीय बाळासाहेबांची आहे त्यामुळे जनता आपल्या सोबत आहे.तयारीला लागा व भगवा फडकवा असा मूलमंत्र श्री.खासदार अनिल देसाई साहेब यांनी उपस्थित शिवसैनिक व पदाधिकारी यांना दिला.

यावेळी शिवसेना पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशाल बरबटे लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री.उत्तम कापसे, सल्लागार श्री.अरुणजी बन्सोड, पारशिवनी तालुका प्रमुख श्री. कैलास खंडार, रामटेक तालुका प्रमुख श्री.हेमराज चोखांद्रे, युवासेना जिल्हा प्रमुख श्री.लोकेश बावनकर, कामगार सेना जिल्हा प्रमुख श्री.समीर मेश्राम, पारशिवनी तालुका संघटक श्री.गणेश मस्के, रामटेक उपतालुका प्रमुख श्री. देवराव ठाकरे, पारशिवनी उपतालुका प्रमुख श्री. सुनील सहारे,

युवासेना रामटेक तालुका प्रमुख श्री.निकुंज गराडे, युवासेना पारशिवनी तालुका प्रमुख श्री.किशोर बावनकुळे, शहर प्रमुख श्री. बादल कुंभलकर, उपशहर प्रमुख श्री. देवेंद्र कोहळे, श्री. सचिन देशमुख,कामगार सेनेचे मधुजी बोरकर,

सर्कल प्रमुख श्री. जितेंद्र जांबे,श्री.इंद्रपाल बोरकर,श्री.सुधाकर कोहापरे, श्री. गंगाधर चवरे, प्रफुल वासनिक, श्री. प्रशांत लकडकर सह सोशल मीडिया प्रमुख हर्षल सावरकर व इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: