Sunday, December 22, 2024
HomeSocial TrendingHanuman | हनुमान हिंदी ट्रेलर रिलीज...कसा आहे ट्रेलर पाहा...

Hanuman | हनुमान हिंदी ट्रेलर रिलीज…कसा आहे ट्रेलर पाहा…

Hanuman : हनुमानजींच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी दिग्दर्शक प्रशांत शर्मा यांनी दिली आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यात तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, वेनेला किशोर, विनय राय, दीपक शेट्टी आणि सत्या हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाचा पॉवर पॅक्ड ट्रेलर आला आहे, जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

प्राइम शो एंटरटेनमेंटच्या यूट्यूब पेजवर हनुमानचा अधिकृत ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. क्लिपची सुरुवात अंजनदारीच्या दुनियेपासून होते, ज्यामध्ये पाण्याखालील सीक्वेन्स दिसतो. याशिवाय बिबट्याच्या मागे धावताना तेजा आणि शक्ती या कलाकारांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

हा ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांनी जय श्री हनुमानाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. टिप्पण्यांमध्ये हार्ट इमोजी शेअर करण्यास सुरुवात केली आहे. ट्रेलरने गूजबंप दिल्याचे लोक म्हणताना दिसतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: